मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Vada Recipes : तुम्हाला स्ट्रीट फूड आवडतं? तर 'या' Recipe वापरून घरी बनवा तेच पदार्थ

Vada Recipes : तुम्हाला स्ट्रीट फूड आवडतं? तर 'या' Recipe वापरून घरी बनवा तेच पदार्थ

भारतीय स्ट्रीट फूड (Street Food) मध्ये वडा हा आद्य पदार्थ आहे. काय काय प्रकार करता येतील पाहा..

भारतीय स्ट्रीट फूड (Street Food) मध्ये वडा हा आद्य पदार्थ आहे. काय काय प्रकार करता येतील पाहा..

भारतीय स्ट्रीट फूड (Street Food) मध्ये वडा हा आद्य पदार्थ आहे. काय काय प्रकार करता येतील पाहा..

  • Published by:  Atik Shaikh

दिल्ली, 15 सप्टेंबर : मोठ्या शहरांमध्ये फास्ट लाईफमुळे आणि पटकन काही तरी खायला मिळावे यासाठी लोकांना स्ट्रीट फूड खाणे फार आवडते. जो एक तर स्वस्त असतो आणि खाण्यासाठीही फार कष्ट करावे लागत नाही. त्यामुळे भारतात स्ट्रीट फूड (Vada Recipes) हे फार लोकप्रिय ठरले आहे. जर तुम्हालाही स्ट्रीट फूड (Street Food) मधील खाद्यपदार्थ खायला आवडत असतील तर तेच पदार्थ तुम्ही घरच्या घरीही बनवून खाऊ शकता. त्यामध्ये मोमोज, चाट पापडी, वडापाव, इडली आणि कांदापोहे या लोकप्रिय आणि झटपट खायला मिलणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश आहे. यात विशेष म्हणजे ही पदार्थ हा भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भारतातील सर्व पदार्थांची चव आपल्याला आपल्या पद्धतीने तयार केलेल्या रेसिपीमुळे मिळू शकते.

मिरची वडा

मिरची वडा हा राजस्थानमधील एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. आता भारतातील इतर भागात सहजरित्या मिळत असल्याने त्याची चव घेणे हे सोपे झाले आहे. हा वडा पाव मिरचीपासून तयार केला जातो. या विशेष मिरचीचा आकार मोठा असल्याने त्यात बटाटा घालून वडा तयार केला जातो.

मेदुवडा

हा पदार्थ दक्षिण भारतात (South Indian Food) प्रसिद्ध असून ते बनवण्यासाठी कुरकुरे आणि चटनी घालून त्याला तेलात तळले जाते. त्याचबरोबर गरमागरम सांबर त्यात मिसळल्यानंतर त्यांची अतिशय चांगली चव लागते.

रोज एक केळ खाणं आहे खूपच उपयुक्त; महिलांना होऊ शकतात हे लाभ

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा हा संध्याकाळच्या वेळी मोठ्या चवीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. साबुदाणा वडा हा उपावासादरम्यानही खाल्ला जातो. स्वच्छ साबुदाणा आणि दाण्याचं कूट याचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या या पदार्थामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे.

बटाटा वडा

हा महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील प्रचंड प्रसिद्ध असा वडा आहे. महाराष्ट्राबरोबर या वड्याला देशभरात पसंती दिली जाते. बटाट्यापासून तयार होणाऱ्या या वड्याला पावासोबतही खाल्ले जाते.

Bad Habits For Health: तुम्हाला 'या' वाईट सवयी असतील आरोग्याला आहे मोठा धोका

कलमी वडा

कलमी वडा ही प्रसिद्ध राजस्थानी डिश आहे. ज्यात प्रोटिन्सचे प्रमाण भरपूर असते. कारण त्यामध्ये चने, मसूर, मूग आणि तूरीच्या डाळीचा समावेश असतो. कलमी वडा बनवताना तुटू नये यासाठी त्यात कोबीचाही वापर केला जातो. या वड्याला पुदिन्याची चटणी किंवा चिंचेच्या चटणीबरोबरही खाल्ले जाते.

First published:

Tags: Food, Health Tips, Mumbai, Tasty food