Home /News /lifestyle /

नवऱ्यासाठी सावित्रीची धडपड; स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला पाठीवर घेऊन डॉक्टपर्यंत पोहोचली पत्नी

नवऱ्यासाठी सावित्रीची धडपड; स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला पाठीवर घेऊन डॉक्टपर्यंत पोहोचली पत्नी

रुग्णालयातील कुणीही या महिलेच्या मदतीला धावून आलं नाही.

    रोहित सिंह/लखनौ, 11 नोव्हेंबर : यमाकडून आपल्या पतीचा जीव आणणाऱ्या पतीव्रता सावित्रीची कथा सर्वांना माहितीच आहे. एकविसाव्या शतकातील अशीच ही सावित्री. जी आपल्या आजारी पतीला वाचवण्यासाठी धडपडत आहे. आजारी पतीसाठी रुग्णालयाकडून स्ट्रेचर मिळालं नाही म्हणून या सावित्रीनं आपल्या पतीला आपल्या पाठीवर घेतलं आणि डॉक्टरांपर्यंत पोहोचली. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रतापगडमध्ये (Pratapgarh) राहणारी शोभा. आपल्या पतीला घेऊन रुग्णालयात पोहोचली. त्याला डॉक्टरपर्यंत नेण्यासाठी तिला स्ट्रेचरही मिळालं नाही. मग काय सावित्रीनं आपल्या पतीला आपल्या पाठीवर घेतलं आणि ती डॉक्टरपर्यंत पोहोचली. 6 महिन्यांपूर्वी तिचा नवरा झाडावरून पडला आणि त्याचा पाय तुटला. पतीच्या उपचारासाठी ती 6 नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात आली. पतीला चालता येत नसल्यानं कसंबसं त्याला घेऊन रुग्णालय गाठलं. रुग्णालयात आल्यानंतरही तिला स्ट्रेचर काही मिळालं नाही. पतीला पाठीवर घेऊनच ती रुग्णालयात फिरत होती. हे वाचा - कॅन्सर सांगून लोकांसमोर पसरले हात; उपचाराचा पैसा महिलेनं जुगारावर उधळला रुग्णालयात आपल्याला वेळेत स्ट्रेचर मिळालं नाही त्यामुळे पतीला पाठीवर घेऊन डॉक्टरांपर्यंत पोहोचावं लागलं, असा आरोप या महिलेनं केला आहे. स्ट्रेचर तर नाहीच पण रुग्णालयातील माणसांनीही तिला मदतीचा हात पुढे केला नाही. रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्ड बॉय, इतर कर्मचारी फक्त पाहत होते. कुणीच तिच्या मदतीला आलं नाही. हे वाचा - बिबट्याच्या जबड्यातून भाचीला वाचवण्यासाठी मामानं केलं जीवाचं रान, नाशिकमधील थरार दरम्यान जिल्हा रुग्णालयातील सीएमएस पीपी पाण्डेय यांनी महिलेचे आरोप फेटाळले आहेत. या महिलेनं कोणतीच मदत मागितली नाही असं ते म्हणाले. पाण्डेय यांनी सांगतिलं, रुग्णालयात 8 स्ट्रेचर आहेत आणि दररोज 500 रुग्ण येतात. कधीकधी स्ट्रेचर रिकामं नसतं, त्यासाठी 10 मिनिटं वाट पाहावी लागते. मात्र काही रुग्ण स्ट्रेचर मिळेपर्यंत थांबत नाहीत. महिलेनं रुग्णालयात मदत मागितली नव्हती.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Uttar pradesh, Wife and husband

    पुढील बातम्या