ऑनलाईन ऑर्डर केला 40 हजार रुपयांचा मोबाईल; पार्सल उघडताच बसला मोठा धक्का

ऑनलाईन ऑर्डर केला 40 हजार रुपयांचा मोबाईल; पार्सल उघडताच बसला मोठा धक्का

आपण ऑनलाईन ऑर्डर (online shopping) केलेल्या पार्सलमध्ये असं काहीतरी येईल याचा विचारही या तरुणानं केला नव्हता.

  • Share this:

लखनौ, 04 नोव्हेंबर : एखादी वस्तू ऑनलाइन ऑर्डर (online shopping) केल्यानंतर बहुतेक वेळा आपण ऑनलाइन जशी वस्तू पाहतो त्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. आपण मागवलेली हीच वस्तू आहे याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मात्र मोठ्या रकमेची वस्तू मागवली असताना भलतीच वस्तू हातात पडली तर काय होईल? कुणालाही मोठा धक्काच बसेल. असाच धक्का बसला तो उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) एका व्यक्तीला. ज्यानं तब्बल 40 हजार रुपयांचा मोबाईल (mobile) ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि पार्सलमधून वेगळीच वस्तू मिळाली.

पीलीभीतच्या (Pilibhit)  कनक गावात राहणारा हरदीप सिंह. याने 24 ऑक्टोबरला ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला होता. या मोबाईलची किंमत जवळपास 40,000 रुपये होती. मोबाईलची डिलीव्हरी घरी आली. हरदीप सिंह नवा मोबाईल येताच खूप आनंदात होता. उत्साहात त्यानं आपलं पार्सल उघडलं आणि पार्सलमध्ये मोबाईल नव्हताच. जी वस्तू होती ती पाहून त्याला धक्काच बसला.

मोबाईलऐवजी त्या पार्सलमध्ये चक्क एक फ्रॉक होता. पार्सल पाहताच हरदीपच्या तळपायातील आग मस्तकात गेली.  संतप्त झालेल्या हरदीपनं लगेच कंपनीनला फोन केला. कंपनीनं त्याच्याकडे सात दिवसांचा कालावधी मागून घेतला. सात दिवसांनंतर कंपनीनं हरदीपला पुन्हा फोन केला. मात्र कंपनीनं आपल्याकडून काहीच चूक झाली नव्हती. आपण योग्य पार्सल पाठवलं होतं, असं सांगितलं.

हे वाचा - पुण्यात बिझनेस पार्टनरने दिला मोठा धोका, तब्बल 95 लाख रुपयांची केली फसवणूक

आपली मोठी फसवणूक झाल्याचं हरदीपला वाटलं. त्यानं लगेच जहानाबाद पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. जहानाबाद पोलीस ठाण्यातील पोलीस हर्षवर्द्धन सिंह यांनी सांगतिलं, अॅमेझॉन कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार आमच्याकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही तपास करत आहोत. तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल.

काही दिवसांपूर्वीच अशाच एका Amazon च्या ग्राहकाची फसवणूक झाली होती. ऑर्डर कंपनीने कॅन्सल केली असल्याचं खोटं सांगून डिलीव्हरी बॉयनं मोबाईल परस्पर विकल्याची घटना दिल्लीत घडली होती. ग्राहकानं मोबाईल ऑर्डर केला होता. ऑर्डर व्यवस्थित पूर्ण झाली. ग्राहकाला मेसेजही आला. पण डिलिव्हरी मिळणार त्या दिवशी डिलिव्हरी बॉयने मेसेज करून त्या ग्राहकाला तुमची ऑर्डर कंपनीकडून कॅन्सल झाल्याचा फोन केला. तुम्हाला कंपनीकडून रिफंड मिळेल, असंही त्याने सांगितलं. प्रत्यक्षात त्या ग्राहकाला फोन डिलिव्हर झाला असा मेसेज आला आणि त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

हे वाचा - विमानात खेळत होती लपाछपी; फ्लाईट कर्मचाऱ्यांनी अशी अद्दल घडवली की...

सणासुदीचे दिवस साधून महत्त्वाच्या E commerce च्या कंपन्यांनी भरभक्कम डिस्काउंट जाहीर केले आहेत. अनेक लोकांनी या मेगासेलची संधी साधत महागड्या वस्तू ऑर्डर केल्या असतील. तर आता त्यांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

Published by: Priya Lad
First published: November 4, 2020, 7:09 PM IST

ताज्या बातम्या