अवघ्या 7 महिन्यांच्या चिमुरड्यामुळेच जमलं! आईबाबा पुन्हा चढणार बोहल्यावर

अवघ्या 7 महिन्यांच्या चिमुरड्यामुळेच जमलं! आईबाबा पुन्हा चढणार बोहल्यावर

15 डिसेंबरला पारंपारिक पद्धतीनं त्यांचा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला.

  • Share this:

रामगोपाल द्विवेदी/लखनऊ, 14 डिसेंबर : "मी या फोटोत का नाही, मी कुठे आहे?", बहुतेक लहान मुलं आपल्या आईवडिलांचे लग्नाचे फोटो पाहताना हा प्रश्न विचारतातच. पण उत्तर प्रदेशमधील एका चिमुरड्याला कदाचित असा प्रश्न विचारण्याची वेळच येणार नाही. कारण खरंतर त्यानेच आपल्या आईबाबांची लग्नगाठ बांधली. त्याच्यामुळेच त्याच्या आईबाबांचं लग्न जमलं आणि ते दोघंही पुन्हा बोहल्यावर चढले. गोरखपूरमधील 7 महिन्यांच्या आशुतोषमुळे त्याचे बाबा मोहित आणि आई जुही यांचं पुन्हा लग्न होतं आहे. सर्वांच्या साक्षीनं दोघंही पुन्हा विवाह करत आहेत. 15 डिसेंबरला पारंपारिक पद्धतीनं त्यांचा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला.

गोरखपूरच्या सूरजकुंडमधील माधवपूर बंधा कॉलनीत राहणारे मोहित साहनी आणि जुही कन्नौजिया 2017 साली एका लग्नसोहळ्यात दोघं एकमेकांना भेटले होते. तिथं त्यांची ओळख झाली, ते एकमेकांशी बोलू लागले. त्यांच्यातील ही जवळीक अधिकच वाढली. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र जात मध्ये आली. दोघांची जात वेगळी. त्यामुळे दोन्ही कुटुंबानं त्यांच्या लग्नाला विरोध केला. मात्र कुणालायच न जुमानता दोघं एक झाले. मे 2018 साली त्यांनी कोर्टात लग्न केलं.

हे वाचा - बंगळुरूतला हा पोस्टमन गिटार वाजवून लोकांना करतोय मंत्रमुग्ध

लग्नानंतर ते दिल्लीला गेले. याचदरम्यान जुहीच्या वडिलांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली. मात्र जुही आणि मोहीत दोघंही आपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले होते. त्यांच्या संसाराचा गाडा बराच पुढे गेला होता. ते फक्त दोघंच नव्हतं तर दोनाचे तीन झाले होते. त्यांना एक मूलही झालं. सात महिन्यांपूर्वीच त्यांनी एक मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव त्यांनी आशुतोष ठेवलं. आशुतोषच्या जन्मानंतर मोहीत आणि जुहीच्या कुटुंबातील नाराजी दूर झाली. दोघांचंही नातं त्यांनी स्वीकारलं. नातू येताच आजी-आजोबा आपला राग विसरले. नातवाच्या रडण्यानं त्यांच्या रागाचं लोणी केलं. जुहीच्या कुटुंबानं मोहितचा जावई म्हणून आणि मोहितच्या कुटुंबानं जुहीचा सून म्हणून स्वीकार केला. इतकंच नाही तर अगदी पुन्हा थाटात त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा - अजब! नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाड रात्रभर फिरलं गावात; पण नवरीचं घरच झालं गायब

मोहितचे वडील संतबली साहनी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाबाबत बरीच स्वप्नं रंगवली होती. मात्र मोहितनं त्यांच्या मनाविरोधात जाऊन  आपल्या पसंतीच्या मुलीसोबत कोर्ट मॅरेज केलं. त्यामुळे त्यांना ती स्वप्नं पूर्ण करता आली नाहीत. जुहीच्या पालकांनाही त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाबाबती स्वप्नं अपूर्ण होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी सर्वांच्या समक्ष दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. मग दोघांनीही अग्नीला साक्षी मानून पुन्हा लग्न केलं. मित्र परिवार, नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

Published by: Priya Lad
First published: December 14, 2020, 11:35 PM IST

ताज्या बातम्या