मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /धक्कादायक! दातदुखीनं त्रस्त होती महिला; डॉक्टरांनी दात काढताच झाला मृत्यू

धक्कादायक! दातदुखीनं त्रस्त होती महिला; डॉक्टरांनी दात काढताच झाला मृत्यू

दुखत असलेला दात (teeth) काढल्यानं महिलेचा मृत्यू झाला, नेमकं काय हे पूर्ण प्रकरण वाचा.

दुखत असलेला दात (teeth) काढल्यानं महिलेचा मृत्यू झाला, नेमकं काय हे पूर्ण प्रकरण वाचा.

दुखत असलेला दात (teeth) काढल्यानं महिलेचा मृत्यू झाला, नेमकं काय हे पूर्ण प्रकरण वाचा.

लखनऊ, 28 डिसेंबर : आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी दातदुखी (teeth pain) झालीच असावी. दातांमध्ये होणाऱ्या वेदना इतक्या तीव्र असतात की त्या सहन होत नाहीत, नकोशा होतात. सुरुवातीला डॉक्टर (doctor) औषधांनी दातांच्या वेदना शमवण्याचा प्रयत्न करतात. तरीही दातदुखी बरी झाली नाही तर दात काढण्याचा (teeth uprooted) सल्ला देतात. दात काढल्यानंतर काही समस्या उद्भवतात. पण एका महिलेच्या मात्र दात काढणं जीवावर बेतलं आहे.

उत्तर प्रदगेशच्या (uttar pradesh) बलिया  (Ballia) जिल्ह्यात घडलेली ही धक्कादायक घटना आहे. एकईल गावात राहणाऱ्या 38 वर्षांच्या सीमा वर्मा दातदुखीनं त्रस्त झाली होती. दातांच्या वेदनांमुळे ती वैतागली होती. एक दिवस तिला वेदना इतक्या असह्य झाल्या की ती एका खासगी रुग्णालयात गेली. तिथल्या डॉक्टरांनी तिला तपासलं आणि दात काढून टाकण्याचा सल्ला दिला.

सीमानं आपल्या कुटुंबालाही याबाबत सांगितलं आणि दात काढून घेतले. सीमाचे पती राजेश वर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी सीमा दातांवर उपचार करण्यासाठी 17 डिसेंबरला रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तिचे दात काढले आणि तिला औषधं देऊन घरी पाठवलं. घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच सीमाची तब्येत बिघडली. तिला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिला तीन इन्जेक्शन दिली आणि काही वेळांनी पुन्हा घरी पाठवलं. घरी आल्यानंतर सीमाचा मृत्यू झाला.

हे वाचा - चिंताजनक! कोरोनामुक्त रुग्णांनाही मृत्यूचा धोका; बरे झाल्यानंतर झाला गंभीर आजार

याबाबत राजेश यांनी नगरा पोलीस ठाण्यात संबंधित खासगी रुग्णालयातील या डॉक्टरविरोधात तक्रार दिली आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप लावला आहे. नगरा पोलीस ठाण्याचे प्रभारी विवेक पांडेय यांनी सांगितलं की, एकईल गावातील राजेश वर्मा यांनी आमच्याकडे या प्रकरणात तक्रार नोंदवली आहे. एका खागगी रुग्णालयातील डॉक्टराविरोधात तक्रार दिली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा - शरीरावर दिसत आहेत काही निराळ्याच खुणा? कर्करोगाचा असू शकतो धोका

महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यामागे काय कारण होतं? डॉक्टरांनी तिला चुकीचे उपचार, चुकीची औषधं दिली का? की आणखी काही कारण होतं, याबाबत आता पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Health, Uttar pradesh, Uttar pradesh news