मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सावधान! सतत हेडफोन्सवर गाणी ऐकल्यानं होऊ शकतात गंभीर आजार

सावधान! सतत हेडफोन्सवर गाणी ऐकल्यानं होऊ शकतात गंभीर आजार

महागडे हेडफोन वापरायची क्रेझ वाढली आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का हेडफोन लावून गाणी ऐकल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

महागडे हेडफोन वापरायची क्रेझ वाढली आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का हेडफोन लावून गाणी ऐकल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

महागडे हेडफोन वापरायची क्रेझ वाढली आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का हेडफोन लावून गाणी ऐकल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

मुंबई, 02 जानेवारी: गाणी ऐकायला कोणाला नाही आवडत. आता तर अत्याधुनिक हेडफोनच्या मदतीने आपण संगीताचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. म्हणजे बाहेर फिरताना, प्रवास करताना, कामावर जाताना किंवा अगदी घरातसुद्धा लोक हेडफोन लावून हिंडताना दिसतात. याच कारणाने बाजारात सध्या वेगवेगळ्या हेडफोनच्या कंपन्यांची रेलचेल पाहायला मिळते. नवी फीचर्स असणारे, महागडे हेडफोन वापरायची क्रेझ वाढली आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का सतत हेडफोन लावून गाणी ऐकल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तुम्हाला ही तासनतास हेडफोन लावून गाणी ऐकायची सवय असल्यास वेळीच सावध व्हा, कारण, त्यातून तुम्हाला गंभीर आजारांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते.

इयरफोन किंवा हेडफोन कानाला लावून फिरणाऱ्या लोकांना कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल की, त्यांची ही सवय मोठ्या आजारांना निमंत्रण देत आहे. सतत इयरफोन लावल्याने कानामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. काही काळाने त्याचं गंभीर आजारात रुपांतर होण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर त्याच्या अतिवापराने तुम्हाला कानाचा कॅन्सरही होऊ शकतो.

हेडफोन वापरण्यासंबंधी काही छोट्या- मोठ्या गोष्टी आपण नकळतपणे करतो. पण, त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. उदाहरण म्हणजे, काही जण न विचार करता दुसऱ्या व्यक्तीचे हेडफोन वापरतात. पण, त्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन असल्यास ते तुम्हालाही होऊ शकतं. त्यामुळे हेडफोनचा जितका कमी वापर करता येईल हे बघा आणि शक्यतो त्याचा वापर करणे टाळा.एका अभ्यासात अशी माहिती दिली आहे की, जास्त वेळ हेडफोनचा वापर केल्याने तुमची ऐकण्याची क्षमता हळू हळू कमी होते. त्यामुळे त्याचा वापर करताना ठराविक वेळेनंतर विश्रांती घ्यावी आणि ते वापरू नये.

इयरफोन किंवा हेडफोन लावून अखंड गाणी ऐकल्याने कानाच्या पडद्यांवर दाब येऊन ते बधीर होतात. त्याचा परिणाम ऐकण्यावर होतो. तुम्हाला कमी ऐकायला येऊ शकतं. हेडफोन लावल्याने कानामध्ये हवेचा शिरकाव होत नाही. त्यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं. ज्या लोकांना हेडफोन लाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकायची सवय असते, त्यांची ऐकण्याची श्रवणशक्ती कमकुवत होते. त्याने पुढच्या काळात कायमचं बहिरेपण येऊ शकतं.

 

First published:

Tags: Lifestyle