Elec-widget

केसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग!

केसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग!

हेअर कंडिशनर वापरल्याने जशी आपल्या केसांना चमक येतेच, पण याच कंडिशनरचा उपयोग इतर अनेक गोष्टींसाठी होतो.

  • Share this:

03 एप्रिल : केसाशिवाय स्त्रीचे सौंदर्य पूर्णच होत नाही. त्यासाठी  स्त्रिया आपल्या केसांची निगा राखण्यासाठी बरेच शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करत. हेअर कंडिशनर वापरल्याने जशी आपल्या केसांना चमक येतेच, पण याच कंडिशनरचा उपयोग इतर अनेक गोष्टींसाठी होतो.

पाहुयात कंडिशनरचे आणखी काही फायदे

1. दागिने म्हटलं की स्त्रियांना मोह आवरत नाही, पण त्याची निगा राखण्याची वेळ येते तेव्हा आपण टाळाटाळ करतो. अशा वेळेस कंडिशनरचा वापर करून दागिन्यांची स्वच्छता करू शकतो. कंडिशनरचा जास्त वापर चांदीच्या दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी करू शकतो, त्यामुळे ते दागिने नव्यासारखे दिसु लागतात.

चांदीचे दागिने नव्यासारखे दिसण्यासाठी एका बाऊलमध्ये 2 मोठे चमचे मिक्स करून घ्या, आणि अर्धा तासानंतर मऊसूत कपड्याने ते दागिने घासून घ्या आणि मग ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

2. तुम्ही बागकाम करण्यास इच्छुक आहात का? जर असाल तर कंडिशनरची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. प्रदूषणामुळे झाडाझुडपांचे खूपच नुक्सान होताना आपण पाहतो. झाडांवरील हे प्रदूषण नाहीसे करण्यासाठी पाण्यामध्ये थोडे कंडिशनर मिसळून झाडांवर शिंपडा, त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाणी झाडावर शिंपडा.

Loading...

3. चामड्याची पर्स वापरावी अशी प्रत्येकाचीच  इच्छा असते, पण त्याची योग्यरित्या जपणूक करणे जरा कष्टाचेच आहे, त्यांची साफसफाई करण्यासाठी कंडिशनर वापर आपण करू शकतो. एखादं सुती कापड घेऊन त्यावर थोडेसे कंडिशनर लावून पर्स किंवा बॅगवर घासल्याने ती अगदी नव्यासारखी दिसू लागेल.

अशा प्रकारे आपण कंडिशनरचा वापर फक्त केसांसाठीच नव्हे तर इतरही बऱ्याच गोष्टींसाठी करू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 03:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...