News18 Lokmat

कडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा!

अनेक घरात गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं खायची पद्धत आहे. ती चवीला कडू असतात, पण त्याचे फायदेही खूप आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 11:02 AM IST

कडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा!

19 एप्रिल : अनेक घरात गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं खायची पद्धत आहे. ती चवीला कडू असतात, पण त्याचे फायदेही खूप आहेत. निसर्गानं कडुलिंब बनवलं ते माणसाला निरोगी ठेवण्यासाठीच जणू काही.

कडुलिंबाचे फायदे

1. उन्हाळ्यात  बाहेरचे जंक फूड खाल्याने किंवा अशुद्ध पाणी प्यायल्यानं पोट खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा वेळी कडुलिंबाची पाने खूप उपायकारी असतात. कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये थोडे मध आणि काळी मिरी पावडर घालून घेतल्यास पोटाचे सर्व आजार बरे होतात.

2. कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे जर कडुलिंबाची सालं,पाने आणि फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते.

3. कानामध्ये कडुलिंबाचे तेल टाकले असता कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे हे सर्व आजार बरे होतात.

Loading...

4. कडुलिंब दातांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि  निरोगी राहतात.

5. पित्ताशयाच्या आजारावर सुद्धा कडुलिंबाचा रस उपायकारी आहे . एवढ्या सर्व आजारावर एकट्या कडुलिबांच्या रसापासून मुक्तता मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 04:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...