मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चहा बनवताना लक्षात ठेवा या टिप्स, रोजचा चहा लागेल स्पेशल!

चहा बनवताना लक्षात ठेवा या टिप्स, रोजचा चहा लागेल स्पेशल!

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. बहुतेकांना कडक आणि गरम चहा पिणं आवडते. 'प्राण जाए पर चाय ना जाए' अशी चहाप्रेमींची (Tea lover) अवस्था असते. तुम्ही किंवा तुमच्या जवळची व्यक्ती चहाप्रेमी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  मुंबई, 4 डिसेंबर : अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. बहुतेकांना कडक आणि गरम चहा पिणं आवडते. 'प्राण जाए पर चाय ना जाए' अशी चहाप्रेमींची (Tea lover) अवस्था असते. तुम्ही किंवा तुमच्या जवळची व्यक्ती चहाप्रेमी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सगळ्यांनाच रिफ्रेशिंग असा जायकेदार चहा प्यायला आवडतं. हिवाळा सुरू झाला असून थंडीत चहा पिण्याची मजा वेगळीच असते. तुम्हाला जरा हटके चहा प्यायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स ( Cooking Hacks) घेऊन आलो आहोत.

  अरबी चहामध्ये सुकवलेल्या लिंबांचा वापर केला जातो. हा चहा (Tea) बनवण्याची अतिशय लोकप्रिय पद्धत आहे. सुकवलेलं लिंबू (Lemon) चहामध्ये वापरल्यास चहाला एक सुंदर अशी चव येते. यासाठी आधी चहाची पावडर उकळून घ्या. त्यानंतर त्यात वाळलेल्या लिंबाचे दोन तुकडे टाका. चांगली उकळी आल्यावर त्यात साखर घाला. तुम्हाला दूध घालून (Milk) चहा प्यायला आवडत असेल तर शेवटी दूध घाला.

  अनेक जण चहा पावडरमध्येच लवंग आणि वेलची घालून ठेवतात; मात्र असं केल्याने लवंग-वेलची या दोन्हींचा सुगंध येत नाही. त्यामुळे ही पद्धत योग्य नसल्याने हे दोन्ही पदार्थ त्यात घालून ठेवू नका.

  मधुमेह असलेल्यांसाठी साखर घातक असते. अशा वेळी साखरेचा चहा आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक मानला जातो. अशा परिस्थितीत चहामध्ये साखरेऐवजी मध, ब्राउन शुगर, गूळ, लिकोरिस यांपैकी कोणत्याही एका गोड पदार्थांचा वापर करावा. यामुळे चहामध्ये गोडवा येईल आणि सामान्य चहापेक्षा त्याला एक वेगळी चव असेल.

  आलं, वेलची, तुळस हे घटक चहाची चव वाढवतात. सहसा या गोष्टी आपण चहामध्ये किसून घालतो; पण तसं न करता, एकत्र बारीक करून ते उकळत्या पाण्यात घालावेत. तुळशीचा चहा आवडत नसेल, तर त्याऐवजी दोन लवंगा आणि दालचिनी पावडरचा एक छोटा तुकडा चहामध्ये घालू शकता. अर्धा इंच आलं, 2 वेलची आणि 3-4 तुळशीची पानं एकत्र कुटावीत आणि चहामध्ये घालावीत. यामुळे चहाला एक वेगळीच चव येईल.

  चहाप्रेमींकडून आंतरराष्ट्रीय चहा दिवसदेखील (International Tea Day) साजरा केला जातो. भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. भारतीयांचं चहाप्रेम सर्वश्रुत असून, वेगवेगळ्या पद्धती वापरून प्रत्येक जण आपल्या चहाची चव खास करण्याचा प्रयत्नात असतो. या पद्धती वापरून तुम्ही रोजच्याच चहाची चव खास करू शकता.

  First published:
  top videos