वजन कमी करायचंय? जाणून घ्या वेलचीचे फायदे

वजन कमी करायचंय? जाणून घ्या वेलचीचे फायदे

वेलची खूप गुणकारी आहे. हिच्या सेवनानं वाढत चाललेलं वजन कमी होतं.

  • Share this:

31 मार्च : मसाले आपल्या जीवनाचा आविभाज्य भाग आहेत. त्यामुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच, पण हे मसाले आरोग्यदायीही आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे वेलची.

प्रत्येकाच्याच घरात वेलची असते. वेलची खूप गुणकारी आहे. हिच्या सेवनानं वाढत चाललेलं वजन कमी होतं.

आयुर्वेदात म्हटलंय की, शरीरातली चयापचय क्रिया वेलचीनं सुधारते. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते.

वेलचीनं काॅलेस्ट्राॅल कमी व्हायला मदत होते.  वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.

वेलची चहात टाकून घेतली की पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. वेलचीनं पोटातला गॅसही निघून जातो.

अशी आहे बहुगुणी वेलची. मूर्ती लहान कीर्ती महान.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 06:34 PM IST

ताज्या बातम्या