रात्रीची झोप उडाली; औषध नाही तर घरगुती उपायांनी करा निद्रानाशावर मात

रात्रीची झोप उडाली; औषध नाही तर घरगुती उपायांनी करा निद्रानाशावर मात

तुमच्या किचनमध्येच असे अनेक पदार्थ आहेत, ज्याचं सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोप (sleep) लागेल.

  • Last Updated: Oct 22, 2020 11:30 PM IST
  • Share this:

जीवनशैली बदलल्याने झोपेच्या समस्या (sleep problem) उद्भवू लागल्या आहेत. अनेकांना झोप लागत नाही, ज्याला निद्रानाश म्हटलं जातं. हल्ली बहुतेक लोकांना निद्रानाश आहे. दिवसभर कामात व्यस्त राहिल्याने ताणतणाव हे त्याचं सर्वात मोठं कारण आहे. तणाव शरीरात अनेक संप्रेरक बदल घडवून आणतो ज्याचा परिणाम झोपेवर होतो.

झोप लागत नसली की अनेक जण झोपेचं औषध घेतात. मात्र थेट झोपेचं औषध घेण्यापेक्षा काही आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींनीदेखील तुम्ही या समस्येवर मात करू शकता.

मेथी

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, मेथी तणाव, निद्रानाश आणि चक्कर यासारख्या समस्यांपासून आराम देण्यासाठी उपयुक्त आहे. दोन चमचे मेथीच्या पानांचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण नियमित घ्या.

केळी

डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, केळ्यामध्ये ट्रायटोपॉन नावाचं अमिनो अॅसिड असतं, जे सेरोटोनिनची पातळी वाढवण्यात मदत करतं. केळ्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. केळ्यात आढळणारे लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम असे घटक झोपेसाठी उपयुक्त आहेत.

गरम दूध 

एक कप गरम दुधामध्ये एक किंवा दीड चमचा दालचिनीची पूड घाला. हे मिश्रण झोपायच्या आधी प्या.

जायफळ

जायफळ हे झोपेचं औषधदेखील आहे. झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात जायफळ पूड घालून प्यायल्यास चांगली झोप लागते. याशिवाय एक चमचा आवळाच्या रसात जायफळ पावडर मिसळून दिवसातून किमान तीन वेळा प्या. याचाही फायदा होईल. जायफळ खाल्ल्यास अपचनाची समस्याही दूर होते.

जिरं

झोप न येण्याचं एक कारण म्हणजे वारंवार पोट खराब होणं. पोटाच्या समस्यांसाठी जिरं फायदेशीर आहे. जिरं पचन सुधारण्यासाठी कार्य करतं. जर पोटाचं आरोग्य चांगलं असेल तर झोप देखील चांगली होईल. कुस्करलेल्या केळीमध्ये एक चमचा जिरं पूड मिसळा. हे मिश्रण झोपायच्या आधी खा. याशिवाय ताण आणि थकवा कमी करण्यासाठी जिऱ्याचा चहादेखील घेता येतो. जिऱ्याचा चहा तयार करण्यासाठी एक चमचा जिरं पाच सेकंद मंद आचेवर गरम करा. नंतर एक वाटी पाणी गरम करून त्यात भाजलेलं जिरं घाला. झोपेच्या आधी हा चहा प्या.

लेव्हेंडर

लेव्हेंडर एक आयुर्वेदिक औषध आहे, ज्यामुळे झोपेची समस्या दूर होते. झोपायच्या आधी एक कप लेव्हेंडर-टी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. यामुळे मानसिक थकवा आणि तणाव कमी होतो. इतकंच नाही तर ही औषधी वनस्पती मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी देखील कार्य करते.

अश्वगंधा

अश्वगंधादेखील निद्रानाश दूर करण्यासाठी एक उपयुक्त औषध आहे. एका संशोधनानुसार ही एक औषधी वनस्पती आहे जी दीर्घकालीन तणाव कमी करते. शरीराला त्वरित विश्रांती मिळवून देते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - झोपेचा विकार: लक्षणे, कारणे...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 22, 2020, 11:30 PM IST

ताज्या बातम्या