Home /News /lifestyle /

तुटणाऱ्या नखांसाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स; होतील सुंदर आणि चमकदार

तुटणाऱ्या नखांसाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स; होतील सुंदर आणि चमकदार

नखांची चांगली वाढ (Nail Growth) होत नसले. सतत तुटत असतील. तर, त्यांना योग्य प्रकारे पोषण (Proper Nutrition) देणं आवस्यक आहे.

    नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : मजबूत नखं (Strong Nails) सहज तुटतं नाहीत. पण लांब वाढलेली नखं कमकुवत आणि पिवळी (Weak and yellowNails) होत असतील तर त्याने हातही खराब दिसतात. जसं केस, त्वचा, दात यांची काळजी (Care)घेतली जाते तसचं नखं मजबूत करण्यासाठी विशेष काळजीची आवश्यकता असते. खरंतर नखांचं आरोग्य आहारावर (Diet) अवलंबून असतं. चांगला आहार घेणाऱ्या व्यक्तीची नखं सुद्धा मजबूत आणि निरोगी (Strong & Healthy Nails) राहतात.चांगल्या आहाराव्यतिरिक्त काही घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने आपली नखं सुंदर (Beautiful Nails) करू शकता. या उपायांनी निर्जीव नखांनाही एक नवीन चमक मिळते शिवाय नखांच्या आजुबाजुची त्वचा मऊ आणि आकर्षक दिसते. पाहुयात नखं सुंदर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय वापरता येतात. (OMG! पठ्ठ्याने McDonald’s मधून इतकं खाणं ऑर्डर केलं की बिल झालं 1.86 लाख रुपये) स्वच्छता आवश्यक नखांना चांगलं वाढवायचं असेल तर, त्यांच्या सुंदर शेपबरोबर त्यांना स्वच्छ ठेवणं खुप महत्वाचं आहे. त्यासाठी नखं कापण्यापूर्वी हात कोमट पाण्यात 5 मिनिटं बुडवून ठेवा. यानंतर नखांची घाण स्वच्छ करा आणि नख कापा. त्यामुळे सहजपणं कापले जातील. कोणत्याही तेल किंवा क्रीमने नखांच्या सभोवतालच्या त्वचेला आणि मॉलिश करा. (Monsoon Wedding: लग्न करताना लक्षात ठेवा 5 Tips; सुंदर होईल अविस्मरणीय क्षण) जिलेटिनचा वापर नखं मजबूत करण्यासाठी जिलेटिनचाही वापरू शकतो. नखं पातळ असतील आणि पटकन तुटत असतील तर गरम पाण्यात 2 चमचे जिलेटिन पावडर टाका आणि त्यात लिंबाचा रस किंवा थोडं दूध आणि गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. आता त्यात आपली नखं घाला. 5 मिनिटांनंतर धुवा. (Parenting Tips: लगेच टेन्शन घेऊ नका! बाळाला शिंका येण्याची ‘ही’ आहेत कारणं) ऑलिव्ह ऑईलचा वापर नखांसाठी ऑलिव्ह ऑईल अत्यंत उपयुक्त आहे. रात्री झोपण्याआधी नखांना ऑलिव्ह ऑईलने मसाज करा. (अशा प्रकारे कांद्याची पारख करायला शिका! कांदे खराब होण्याचं टेन्शन विसरा) व्हिटॅमिन ई कॅप्सूल ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलमधील ऑईल टाका आणि झोपायच्याआधी हात त्यात बुडवा आणि आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करा. नखं मजबूत आणि सुंदर राहतील. नारळ तेलनारळ तेल नखांच्या आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे. त्यात फॅटी अ‍ॅसिड आणि इतर पोषक घटक असतात त्यामुळे नखं मजबूत होतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Health Tips, Home remedies, Lifestyle

    पुढील बातम्या