Period च्या दुखण्याला आता या तेलामुळे मिळेल आराम, एकदा वापरून पाहा!

Period च्या दुखण्याला आता या तेलामुळे मिळेल आराम, एकदा वापरून पाहा!

मासिक पाळी दरम्यानचं दुखणं हे सर्वसामान्यपणे पाच ते सात दिवस राहत असलं तरी पहिले दोन दिवस हे असह्य असतात.

  • Share this:

प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदना सहन कराव्याच लागतात. या दरम्यान पोटात दुखणं, कंबर दुखी, हार्मोनमध्ये बदल होत असल्यामुळे चिडचिडही होते. मासिक पाळीचं दुखणं हे सर्वसामान्यपणे पाच ते सात दिवस राहत असलं तरी पहिले दोन दिवस हे असह्य असतात. अनेकदा महिला दुखणं असह्य होत असल्यामुळे पोटाला शेक घेणं, गरम पाणी पिणं आणि औषध घेण्याचा पर्याय निवडतात. पण जर तुम्हाला औषधं घ्यायची नसतील तर आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. याचा नियमित वापर केला तर तुम्हाला या दुखण्यापासून नक्कीच आराम मिळू शकतो.

मासिक पाळीत होणाऱ्या दुखण्यापासून आराम मिळवायचा असेल तर लैवेंडर ऑइल हा एक चांगला पर्याय आहे. यात अँटी- फ्लेमेटरी तत्त्व असतात. यामुळे सूज आणि दुखणं कमी होतं. या तेलाने ओटीपोटाला हलक्या हातांनी मसाज केल्यास दुखणं कमी होतं तसेच या तेलाने शेक घेतला तर त्याचाही चांगला फायदा होतो.

लवंगाचं तेल ही फार फायदेशी आहे. मसाल्यांमध्ये लवंग तर हमखास मिळते. मासिक पाळीच लवंगाच्या तेलाने ओटीपोटाचा मसाज केल्यास बराच आराम मिळतो. कोमट पाण्याच्या टबमध्ये या तेलाचे काही थेंब टाका आणि काही वेळासाठी यात पाय टाकून बसा. असं केल्याने तुम्हाला आराम मिळेल.

दालचिनीचं तेलही मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाला कमी करतं. यामुळे गर्भाशय संकुचित होते. पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांमध्ये दालचीनीच्या तेलाने ओटीपोटाचा मसाज केल्यास बराच आराम मिळतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

रात्री चांगली झोप घेण्यात भारतीय अव्वल- आंतरराष्ट्रीय सर्व्हे

Parle G कंपनीत काम करणाऱ्या 10 हजार लोकांची जाऊ शकते नोकरी, काय आहे पूर्ण प्रकरण

प्रेमात सीरियस नसतात या राशीची लोकं, जोडीदाराची करू शकतात सहज फसवणूक

रुबाब म्हणून नव्हे तर पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी 10 फायदे!

VIDEO : उदनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या