Home /News /lifestyle /

घरात आता बिनधास्त करा विजेचा वापर; एकही रुपया येणार नाही बिल; आताच करा हे काम

घरात आता बिनधास्त करा विजेचा वापर; एकही रुपया येणार नाही बिल; आताच करा हे काम

वीजबिल वाचवण्यातही करा हा उपाय

वीजबिल वाचवण्यातही करा हा उपाय

आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar panel) बसवून विजेच्या बिलापासून सुटका करून घेऊ शकता

    मुंबई, 09 डिसेंबर:  ऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केंद्र सरकार सौर ऊर्जेला प्राधान्य देत आहे. सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा सरकारी योजनाचा लाभ घेऊन आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar panel) बसवून विजेच्या बिलापासून सुटका करून घेऊ शकता. घराच्या छतावर सोलर पॅनल्स कशी बसवायची, याबाबत जाणून घेऊ या. 'झी न्यूज हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Rooftop Solar panel) बसवून तुम्ही विजेवर होणारा खर्च कमी करू शकता. सोलर रूफटॉप 20 वर्षं वीज पुरवतं. त्यासाठी सबसिडीही दिली जाते. त्यामुळे यासाठी आलेला खर्च 5-6 वर्षांत भरून निघतो. पुढच्या कालावधीत निःशुल्क वीज वापरता येते. हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे फायदे माहिती आहे का? अनेक समस्यांपासून होईल सुटका सोलर रूफटॉप (Solar Rooftop Yojana) ही केंद्र सरकारची योजना आहे. देशात अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली आहे. यासाठी केंद्र सरकार ग्राहकांना अनुदान देतं. ग्रुप हाउसिंगमध्ये सोलर पॅनल बसवल्यास विजेचा खर्च तब्बल 30 ते 50 टक्क्यांनी कमी करता येतो. सोलर रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत केंद्र सरकार 500 किलोवॅटपर्यंतचा सोलर रूफटॉप प्लांट उभारण्यासाठी 20 टक्के सबसिडी देत आहे. 1 ते 3 किलोवॅटपर्यंतच्या प्रकल्पांसाठी 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंतच्या प्रकल्पांसाठी 20 टक्के अनुदान दिलं जातं. सोलर पॅनल बसवण्यासाठी जास्त जागा लागत नाही. एक किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 10 चौरस मीटर जागा लागते. सोलर पॅनलमुळे प्रदूषण कमी होण्यासोबतच पैशांचीही बचत होते. आपल्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्ही 1800-180-3333 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकता. सोलर पॅनलचं घराच्या छतावर इन्स्टॉलेशन करण्यासाठी प्रमाणित एजन्सींची राज्यवार यादीदेखील अधिकृत वेबसाइटवर आहे. सोलर रूफटॉप योजना (Solar Rooftop Yojana) भारत सरकारच्‍या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत चालवली जात आहे. सोलर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी तुम्ही वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही mnre.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता. ऑनलाइन अर्ज कसा करावा - प्रथम solarrooftop.gov.in वर जा. होम पेजवरील 'Apply for Solar Roofing' या पर्यायावर क्लिक करा. पेज उघडल्यानंतर तुमच्या राज्याच्या लिंकवर क्लिक करावं. यानंतर तुमच्या समोर Solar Roof Application हे पेज ओपन होईल. अर्ज भरून तो सबमिट करा. या टप्प्यातून तुम्ही सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या