सावधान! रंग गोरा होण्यासाठी क्रीम वापरणं घातक, आजारांना देताय निमंत्रण

सावधान! रंग गोरा होण्यासाठी क्रीम वापरणं घातक, आजारांना देताय निमंत्रण

त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी स्कीन क्रीमचा अतिवापर धोकादायक असल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त मर्क्युरीचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

सध्या सगळीकडेच जाहीरातबाजीचा जमाना आहे. त्यात ज्या उत्पादनाची जाहीरात केली जाते ते तितकेच उपयोगी आहे का याची शाश्वती नाही. आता तर सौंदर्यप्रसाधनांबद्दलचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यात त्वचेला मुलायम आणि तजेलदार करणाऱ्या क्रीममुळे त्वचेला गंभीर इजा होत असल्याचं तसेच त्यामुळे आजार होत असल्याचंही समोर आलं आहे. या क्रीममध्ये मेटल मर्क्युरी म्हणजेच पाऱ्याचा वापर होत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

जगभरात अशा स्कीन क्रीमचा वापर केला जातो. दिल्लीतील एका मार्केटमधून 4 नमुन्यात मर्क्युरीचे प्रमाण 48.17 ते 1 लाख 10 हजार पीपीएम इतकं आढळलं. हा दावा झिरो मर्क्युरी वर्किंग ग्रुपने केला आहे. मर्क्युरीमुले होणारं प्रदुषणावर हा ग्रुप काम करतो. ग्लोबल स्टडीमध्ये भारतासाठी टॉक्सिक लिंकने स्टडी केला.

12 देशांत झालेल्या या अभ्यासात 158 स्कीन क्रीम नमुन्यातील 96 मध्ये मर्क्युरीचे प्रमाण 40 पीपीएम ते 1 लाख 30 हजार पीपीएम इतकं आहे. भारतात घेण्यात आलेल्या नमुन्यात 40 ते 1 लाख 13 हजार पीपीएम इतकं प्रमाण आढळलं. मर्क्युरीच्या मर्यादीत प्रमाणापेक्षा हे अधिक आहे. भारतातून घेण्यात आलेल्या या नमुन्यांची चाचणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये करण्यात आली. यातही जितक्या कंपन्यांचे नमुने घेतले त्यात सर्वाधिक आशियातील आहेत. पाकिस्तानमध्ये 62 टक्के, थायलंडमध्ये 19 टक्के तर चीनमध्ये 13 टक्के क्रीमचे उत्पादन होते.

त्वचा उजळवण्यासाठी किंवा त्वचेचा रंग गोरा होण्याचा दावा करणाऱ्या स्कीन क्रीम आणि साबणात मर्क्युरीचे कॉमन इन्ग्रेडिअंट वापरले जाते. याशिवाय आय मेकअप प्रॉडक्टस यासह इतर काही सौंदर्यप्रसाधनांमध्ये मर्क्युरी वापरले जाते.

अशा प्रकारच्या क्रीमचा अतिवापर घातक आहे. मर्क्युरी असलेल्या क्रीमच्या वापराने किडनीचे विकार होतऊ शकतात. याशिवाय व्यक्तिच्या नर्व्हस सिस्टीम, पाचन शक्तीवरही परिणाम होतो. डिप्रेशन, स्कीन रॅशेसचा त्रासही होण्याची शक्यता असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2019 07:47 AM IST

ताज्या बातम्या