Home /News /lifestyle /

Oily Skin साठी वापरा गुलाब पाणी किंवा कोरफड, हे आहेत BEST फेस पॅक

Oily Skin साठी वापरा गुलाब पाणी किंवा कोरफड, हे आहेत BEST फेस पॅक

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची (skin care)अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. शरीराचं आरोग्य राखण्याबरोबरच त्वचेची काळजी घेणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.

    मुंबई, 09 डिसेंबर: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची (skin care)अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. शरीराचं आरोग्य राखण्याबरोबरच त्वचेची काळजी घेणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकजण त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी ब्युटी प्रॉडक्ट्चा वापर करत असतात. अनेकदा याचा परिणाम होतो कधी होत नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्या घरी देखील फेस पॅक बनवू शकता. अनेकजणांची त्वचा ही ऑयली (Oily Skin) म्हणजे तेलकट असते. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. पण तुम्ही घरच्या घरीच तुमच्या त्वचेसाठी फेस पॅक तयार करू शकता. जाणून घ्या कसे हे फेस पॅक तयार करायचे आणि त्यामुळे तुम्हाला बाहेरील ब्युटी प्रॉडक्ट्ड्सचा वापर कमीतकमी करावा लागेल. ॲलोवेरा जेलचा फेस पॅक सर्दीच्या या दिवसांत तुमच्या त्वचेला ॲलोवेरा (कोरफड) खूपच फायदेशीर ठरेल. याचा वापर करून तुम्ही त्वचा तजेलदार ठेवू शकता. यासाठी तुम्हाला सुरुवातीला 1 चमचा ॲलोवेरा जेल (aloe vera gel) घ्यावं लागेल. हे जेल एका स्प्रे बॉटलमध्ये टाका. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस (Lemon Juice) आणि पाणी मिक्स करा. त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवून थंड झाल्यावर तुम्ही याचा वापर फेस पॅक म्हणून करू शकता. गुलाब पाणी गुलाब पाणी (rose water) त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. विविध पद्धतींनी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करून चेहरा तजेलदार ठेवू शकता. गुलाब पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कोमट पाणी घ्यायचे आहे. यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडीशी कडूलिंबाची पाने टाका. हे चांगले एकत्र झाल्यानंतर 30 मिनिटे थंड होऊद्या. त्यानंतर  स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी घेऊन तुम्ही चेहऱ्यावर याचा वापर करून चेहरा ताजा ठेवू शकता. कडूलिंबाची पाने कडूलिंबाची काही पाने पाण्यात उकळून घेऊन ते थंड करा. यामध्ये 4 ते 5 थेंब ॲसेंशियल ऑइल मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही एका बाटलीमध्ये भरून वापरू शकता. या घरगुती उपायांमुळे तुमचा खर्च कमी होऊ शकतो आणि हे उपाय फार खर्चिकही नाहीत. त्यामुळे अवश्य करून पहा.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या