Home /News /lifestyle /

आंबा खाऊन साल फेकून देताय? मग 'हे' फायदे एकदा वाचाच!

आंबा खाऊन साल फेकून देताय? मग 'हे' फायदे एकदा वाचाच!

आंब्याची साल फेकून देत असाल तर ही चूक अजिबात करु नका. जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे(Health benifits).

    नवी दिल्ली, 26 जून : उन्हाळा सुरु झाला की आंबे बाजारात यायाला सुरुवात होते. आंबे खाण्यासाठी अनेकजण या हंगामाची आतुरतेनं वाट पाहत असतात. आंबे, आंब्याचा रस याचीच मज्जाच काही वेगळी असते. हे खाण्यासाठी खूप वाट पहावी लागते खरी मात्र 'सब्र का फल मीठा होता है', या वाक्याप्रमाणं वाट पाहिल्यानंतर त्याचं फळ खरंच गोड मिळतं. आंबा हा आरोग्यासाठीही खूप गुणकारी असतो. मात्र आंबा (Use of mango peel) खाल्ल्यानंतर तुम्ही जी साल टाकून देता तीही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, हे तुम्हाला माहित आहे का?. त्यामुळे आंब्याची साल फेकून देत असाल तर ही चूक अजिबात करु नका. जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे(Health benifits). हेही वाचा - गोड खाल्ल्यानंतरही कंट्रोलमध्ये राहिल शुगर; Diabetes असणाऱ्यांनी करा फक्त 'हे' काम आंब्याच्या सालीचे फायदे - 1. आंब्याच्या सालीमध्ये अॅंटीऑक्सिडंट असतात. जे तुमच्या शरिरासाठी खूप फायदेशीर असतात. आंब्याच्या सालीमुळे फुफ्फुसाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यापासून सुटका मिळण्यास मदत होते. 2. वजन कमी करायचे असेल तर आंब्याची सालेही खाऊ शकता. आंब्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं. 3. कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही प्रकारात वापरल्या जाणार्‍या आंब्याची साल देखील खूप फायदेशीर असते. त्वचेसाठीही साल खूप उपयुक्त आहे. हेही वाचा - Onion Hacks : फक्त एका कांद्याचा घरातील या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग; पैसा आणि वेळही वाचेल 4. धूळ, माती आणि घामामुळे चेहरा चिकट होतो. यामुळे चेहऱ्याच्या अधिक समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही आंब्याची साल चेहऱ्यावर लावावी. 5. फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधून बाहेर काढा आणि ही साले चेहऱ्यावर हलक्या हातांनी चोळा आणि मसाज करा. असे केल्याने चेहऱ्यावर दिसणारी मोठी छिद्रे झाकले जातील. 6. आंब्याच्या सालीपासून तुम्ही नैसर्गिक स्क्रबही तयार करू शकता. विशेष म्हणजे याचा वापर चेहरा आणि शरीर दोन्हीवर करता येतो. फक्त आंब्याची साल बारीक करून पावडर बनवा. नंतर त्यात कॉफी पावडर टाकून स्क्रब तयार करा.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या