Home /News /lifestyle /

Weight Loss Tips : फेकून न देता वेट लॉससाठी वापरा लिंबाची साल, होतात इतरही फायदे

Weight Loss Tips : फेकून न देता वेट लॉससाठी वापरा लिंबाची साल, होतात इतरही फायदे

लिंबूच्या सालीत आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले बायोअॅक्टिव्ह घटक मुबलक प्रमाणात आढळतात. लिंबाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन सी असते.

  मुंबई, 5 ऑगस्ट : सर्वच ऋतूत आपण लिंबाचा भरपूर प्रमाणात वापर करतो. सामान्यत: लिंबूचा लगदा आणि रस वापरला जातो आणि उरलेली साल फेकू दिली जाते. परंतु हेल्थलाइनच्या एका रिपोर्टनुसार लिंबूची सालही अतिशय फायदेशीर असते असे संशोधनात आढळून आले आहे. लिंबूच्या सालीत आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले बायोअॅक्टिव्ह घटक मुबलक प्रमाणात आढळतात. लिंबाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. याशिवाय त्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील आढळते. लिबूच्या सालीत आढळणारा डी लिमोनिन घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा असतो. जाणून घेऊया लिंबाची साल किती फायदेशीर आहे याविषयी. लिंबाच्या सालीचे फायदे वजन कमी करण्यास उपयुक्त लिंबाच्या सालीच्या चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी असते जे वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. हा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात एका लिंबाची साल आणि थोडे चिरलेले आले घ्या. त्यात एक कप पाणी घाला. 1 ते 2 मिनिटे उकळवा. त्यानंतर हे मिश्रण गाळून कपमध्ये घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला आणि या चहाचा आनंद घ्या. Excess Of Salt: जेवणात तुम्ही पण वरून मीठ घेताय का? या आरोग्य समस्या वेगात वाढतील दातांचे आजारांपासून संरक्षण करते लिंबाच्या सालीमध्ये अँटीबैक्टीरियल घटक आढळतात जे दातांमधील पोकळी आणि हिरड्यांचे संक्रमण दूर करतात. एका संशोधनानुसार लिंबाच्या सालीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक तोंडाच्या आजारांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांना संपवण्यासाठी सक्षम असतात. अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध लिंबाची साल अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून सेल्युलर डॅमेजचे संरक्षण करते. यातील व्हिटॅमिन सी आणि डी लिमोनेन सारखे अँटीऑक्सिडंट्स हृदयविकारांसारख्या इतर अनेक आजारांपासून आपले संरक्षण करतात. लिंबाची साल सुरकुत्या, मुरुम, पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉटपासून संरक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रतिकारशक्ती वाढवते लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याचा वापर अन्नात केल्यास ऋतूतील फ्लू, खोकला, सर्दी इत्यादीपासून बचाव होऊ शकतो. संशोधनानुसार दररोज एक ते दोन ग्रॅम व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास सामान्य सर्दी होण्याची शक्यता 8 टक्क्यांनी कमी होते.

  Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? आंघोळीच्या पाण्यात घाला सैंधव मीठ, होतात आश्चर्यकारक फायदे

  हृदयासाठी फायदेशीर काही संशोधनानुसार लिंबाच्या साल हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते. यात असलेले डी लिमोनेन रक्तातील साखर आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss

  पुढील बातम्या