सुकामेव्यात अक्रोड (walnut) जितके स्वादिष्ट लागतात तितकेच ते शरीराच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. घरातील आजीआजोबा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नेहमीच अक्रोड खाण्याचा सल्ला देतात. अक्रोडमध्ये फॅटी अॅसिड, ओमेगा-3 इत्यादी असतात. जे मेंदूला हेल्दी बनवतात. जर गायीच्या तुपासोबत अक्रोड खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया अक्रोड खाण्याच्या फायद्यांविषयी-
टीबीच्या रुग्णांना फायदा
अक्रोड आणि गायीच्या तुपाचे मिश्रण टीबीच्या रुग्णांना खूप गुणकारी आहे. 3 अक्रोड, लसणाच्या 5 पाकळ्या आणि 1 चमचा गायीचं तूप हलकंसं परतून घ्यावं. या औषधाच्या सेवनानं टीबीच्या रुग्णांना लाभ होतो.
पुळ्यावर करा असा इलाज
myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या अनुसार, ज्या लोकांना खूप पुळ्या होत असतात. त्यांनी रोज नियमित 5 अक्रोड खायला हवे. त्याने पुळ्या कमी होतात आणि त्वचेवर निखार येतो.
मेंदूच्या मजबुतीसाठी
25 ते 30 ग्रॅम अक्रोड खाण्यानं मेंदू मजबूत होतो. गायीच्या तुपात अक्रोड शेकून खाण्याने मेंदूला जास्त फायदा होतो.
सांधेदुखी
सांधेदुखीपासून सुटका हवी असेल तर अक्रोड फायद्याचे आहे. 5 ग्रॅम अक्रोडचा गर, 5 ग्रॅम सुंठ पावडर, हे सगळे एरंडीच्या तेलात वाटून घ्या. मग हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्या. त्याने सांध्यांच्या दुखण्यात फायदा होतो. अक्रोडच्या तेलाने मालिश केल्याने पण सांधेदुखी वर लाभ मिळतो.
स्नायूंच्या वेदनांपासून आराम
अक्रोडचं तेल हाडे आणि स्नायूंसाठी खूप गुणकारी आहे. जर नियमितपणे अक्रोडच्या तेलाने मालिश केली तर पूर्ण शरीर मजबूत होईल आणि वेदनेच्या समस्येने सुटका होईल.
शरीरावरची सूज कमी करतं
शरीरावरची सूज दूर करण्यात अक्रोड खूप लाभदायक आहे. कुठल्याही प्रकारची दुखापत झाली तर शरीरावर सूज येते त्यावर अक्रोडच्या सालीची पावडर करून त्याचा लेप लावावा, त्याने तात्काळ फायदा होतो. आखडलेले स्नायू पण मोकळे होतात.
मूळव्याधीमध्ये फायद्याचे
मूळव्याध झालेल्या रुग्णांनी अक्रोड खाण्याने फायदा होतो. अक्रोडच्या टरफलाचे भस्म बनवून, त्यात 35 ग्रॅम गुडूची मिसळावी आणि रोज दोनदा खावी त्याने मुळव्याधाची समस्या काही दिवसात दूर होईल.
लकवा झालेल्या रुग्णांसाठी
ज्यांना लकवा झालाय अश्या रुग्णांसाठी अक्रोड चा औषध म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. अक्रोडच्या तेलाचे काही थेंब रोज सकाळी नाकात टाकत राहावे, लकवा लवकर ठीक होतो. आणि बधीर झालेले स्नायू सक्रीय होऊ लागतात.
बद्धकोष्ठता दूर होते
myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या अनुसार, बद्धकोष्ठतेच्या समस्येत पण अक्रोड खूप गुणकारी आहे. अक्रोडच्या टरफलाला उकळून गाळून घ्या, मग हे पाणी प्या त्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. कधी कधी पोटात मुरडा येतो, याचे मुख्य कारण आतडे कमजोर झालेले असतात किंवा आतड्यांना सूज आलेली असते. त्यासाठी एक अक्रोड पाण्यासोबत बारीक करून त्याचा लेप तयार करा आणि हा लेप बेंबीवर लावा, त्याने मुरडा येण्याची समस्या ठीक होते.
अंथरुणात लघवीची मुलांची समस्या दूर होते
काही मुलांना अंथरुणात लघवी होते, अशा मुलांना सकाळी नियमितपणे गायीच्या दुधासोबत दोन अक्रोड, आणि 20 किसमिस 2 आठवडे खाऊ घाला त्याने ही समस्या बरी होते.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - आरोग्यदायी पाककृती, पौष्टिक आहार...
न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.