मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नारळ वापरल्यावर करवंटी फेकून देत असाल तर हे वाचाच; नारळाबरोबर शेंडीचेही आहेत फायदे

नारळ वापरल्यावर करवंटी फेकून देत असाल तर हे वाचाच; नारळाबरोबर शेंडीचेही आहेत फायदे

नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. म्हणूनच नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं.

नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. म्हणूनच नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं.

नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. म्हणूनच नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं.

दिल्ली, 23 ऑगस्ट : आता सणांचे दिवस सुरू आहे. त्यामुळे घरोघरी नारळ (Coconut) देखील आणला जातो. एरवीदेखील भाजीसाठी नारळ वापरला जातो. नारळाची चटणी सुंदर लागते, भाजीत घातल्यास भाजीची चव (Test) वाढते. त्यामुळे घरात घरामध्ये नारळ आणला जातो. बरेच लोक नारळ फोडल्यानंतर त्याच्या साली फेकून देतात. पण, नारळाच्या साली (Coconut Husk) फार उपयोगी असतात. नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग (Use) करता येतो. म्हणूनच नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नारळाची साल देखील अत्यंत उपयोगी आहे. जाणून घेऊयात नारळाच्या सालीचे उपयोग

खत

झाड लावण्यासाठी माती बरोबर नारळाच्या सालीचाही वापर केला जातो. कॉकपीट म्हणजे नारळाचा भुसा झाडे लावताना वापरतात. कॉकपीट वापरल्यास झाडं वेगाने वाढायला सुरुवात होते. कॉकपीट घरच्याघरी करता येतं. कॉकपीट तयार करण्यासाठी नारळाची साल भांडंभर पाण्यात 15 दिवस बुडवून ठेवा. पंधरा दिवसानंतर काढून बारीक करा. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या.

(दाखवा हुशारी! खरेदी करताना ‘या’ ट्रिकने ओळखा बनावट शूज; होणार नाही फसवणूक)

चरल डाय

केसांसाठी काळ्या रंगाचा हेअर कलर म्हणून नारळाच्या सालीचा वापर करता येतो. त्याकरता नाराळाची साल लोखंडाच्या कढईमध्ये गरम करा. त्यानंतर ही साल पेटवा. साल जळाली की पूर्ण जळालेल्या सालींची पावडर तयार करा. या पावडरमध्ये 3 चमचे नारळाचं तेल, 2 चमचे राईचं तेल एकत्र करून केसांना लावा. नॅचरल डाय प्रमाणे केस काळे होतील.

घासणी

भांडी घासण्यासाठी नारळाची साल वापरता येऊ शकते. यामुळे भांडी स्वच्छ निघतात. बर्‍याच वर्षांपासून घराघरांमध्ये अशाप्रकारे स्क्रबर वापरण्याची पद्धत होती.

(जेफ बेझोसचं Ice-cream प्रेम! 24 तास कधीही खाता यावं म्हणून घरातच लावलं मशीन)

दातांच्या स्वच्छतेसाठी

नारळाच्या सालीचा वापर करून दात साफ करता येतात. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होतो. नारळाची साल जाळून त्याची पावडर तयार करा. दात घातसाना पावडरचा रोज वापर करा. यामुळे दात स्वच्छ होऊन हिरड्याही मजबूत होतील.

(पावसाळ्यात वाढवा Immunity,पळतील आजार; असा असावा आहार)

आळूचा कंद सोलण्यासाठी

काही घरांमध्ये अळूच्या कंदाची भाजी केली जाते. मात्र हा अळूचा कंद सोलणं कठीण काम असतं. कारण, त्यामुळे हाताला खाज येते. अळूच्या कंदाची साल काढण्यासाठी नारळाच्या सालीचा वापर करता येऊ शकतो.

(वजन कमी करण्यासाठी सरळ नाही उलटं चाला; पाहा कसा फायदा होतो)

मुरगळ आणि सूज यावर उपयोगी

नारळाची पावडर मुरगळलेला पाय किंवा सूज आलेल्या ठिकाणी लावता येते. याकरता नारळाच्या सालीची पावडर तयार करा. या पावडरमधे थोडीशी हळद मिसळा आणि वेदना असलेल्या ठिकाणी लावा दुखणं कमी होईल.

First published:
top videos

    Tags: Home remedies, Lifestyle