मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हिवाळ्यातल्या आहारात अवश्य समावेश करा बाजारीचा, होतील अनेक फायदे

हिवाळ्यातल्या आहारात अवश्य समावेश करा बाजारीचा, होतील अनेक फायदे

बाजरीची भाकरी खाण्यासोबतच बाजरीच्या पिठाचा वापर करून पराठा, खिचडी आणि लाडू यांसारखे विविध पदार्थ खाऊन तुम्ही तुमच्या आहारात बाजरीचा सहज समावेश करू शकता.

बाजरीची भाकरी खाण्यासोबतच बाजरीच्या पिठाचा वापर करून पराठा, खिचडी आणि लाडू यांसारखे विविध पदार्थ खाऊन तुम्ही तुमच्या आहारात बाजरीचा सहज समावेश करू शकता.

बाजरीची भाकरी खाण्यासोबतच बाजरीच्या पिठाचा वापर करून पराठा, खिचडी आणि लाडू यांसारखे विविध पदार्थ खाऊन तुम्ही तुमच्या आहारात बाजरीचा सहज समावेश करू शकता.

नवी दिल्ली, 27  नोव्हेंबर: थंडीचा ऋतू (winter season) सुरू झाला आहे. या काळात निरोगी ( healthy) राहण्यासाठी आहारात ( diet) अनेक गोष्टींचा समावेश केला जातो, तर काही गोष्टी आहारातून वगळतात. हिवाळ्यात तुमच्या आहारात बाजरीचा (Millet) समावेश केला, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर (beneficial) ठरू शकतं. बाजरीची भाकरी खाण्यासोबतच बाजरीच्या पिठाचा वापर करून पराठा, खिचडी आणि लाडू यांसारखे विविध पदार्थ खाऊन तुम्ही तुमच्या आहारात बाजरीचा सहज समावेश करू शकता. बाजरी उष्ण असते. त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस, फायबर्स, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स ( antioxidants) त्यात आढळतात. त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळेच थंडीच्या दिवसात आहारात बाजरीचा समावेश करणं गरजेचं आहे. आहारात बाजरीचा समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ या.

पचनक्रिया चांगली राहते

बाजरीची भाकरी किंवा बाजरीपासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया चांगली राहते. बाजरीत भरपूर फायबर्स असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.

हेही वाचा-  cancer : कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

 ब्लड शुगर लेव्हल व्यवस्थित राहते

आहारात बाजरीचा समावेश केल्यास तुमची ब्लड शुगर लेव्हल व्यवस्थित राहते. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांना बाजरीचं पीठ खाण्याचा सल्ला दिला जातो.

पोषण आणि ऊर्जा

बाजरीमध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस, फायबर्स, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारची अँटिऑक्सिडंट्स असतात. आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराचं चांगलं पोषण होण्यासोबतच ऊर्जा मिळते.

हाडं मजबूत होतात

बाजरीत भरपूर कॅल्शियम असतं. ते हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतं.

हेही वाचा-  Winter health tips : हिवाळ्यात ठणठणीत राहायचं; चहा-कॉफीऐवजी दररोज सकाळी प्या एक ग्लास Detox drink

 शरीराचं तापमान योग्य राहतं

आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराला ऊब मिळते. त्यामुळे शरीराचं तापमान योग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.

खराब कोलेस्टेरॉल कमी करते

बाजरीत नियासिन नावाचा घटकदेखील असतो. तो खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

रक्तदाब नियंत्रित करते

बाजरीत पोटॅशियम आणि मॅग्नेशियमदेखील मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

महाराष्ट्रात बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. ग्रामीण भागात बाजरीची भाकरी आवडीने खाल्ली जाते. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात तुम्हाला बाजरीची भाकरी खाणं खूप फायदेशीर ठरेल.

First published:

Tags: Health Tips