स्वयंपाकघरातील या 2 गोष्टी आजारी पडल्यावर करतील मदत

स्वयंपाकघरातील या 2 गोष्टी आजारी पडल्यावर करतील मदत

घरातल्या काही गोष्टी तुम्हाला आजार बरे करण्यास मदत करतील. स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा आरोग्यासाठी उपयोग होतो.

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट : आजारपण काही सांगून येत नाही. सर्दी, ताप, खोकला तर कोणत्याही सिझनमध्ये होतो. म्हणजे एकूणच असे आजार अचानक झाल्यावर आपली धावपळ होते ती उपचारांसाठी. घरगुती उपायांनीसुद्धा अनेकदा गुण येतो. घरामध्ये असणाऱ्या काही गोष्टीही आजारांवर उपाय म्हणून कामी येतात. पण आपल्याला त्या गोष्टींविषयी किंवा त्यांच्या उपयोगांविषयी माहिती नसते. स्वयंपाकघरातल्या काही गोष्टी तुम्हाला आजार बरे करण्यास मदत करतील. जाणून घ्या स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा आरोग्यासाठी उपयोग होतो.

मेथी

मेथी प्रत्येक घरात नक्कीच आढळते. चवीला कडवट असली तरी त्याचे अनेक फायदे आहेत, ती शरीराकरीता अत्यंत गुणकारी आहे. मेथीच्या बीयासुद्धा फायदेशीर असतात. मेथीच्या दाण्यांचा वापर मसाल्यात तर होतोच त्याशिवाय, औषधाच्या रूपातही ते कामी येतं. मेथीच्या पानांची भाजी करतात. चवीला कडू मात्र आयुर्वेदिकरीत्या मेथी गरम आहे. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी हे गुणकारी आहे.

वाचाः झोपण्याच्या या 4 पोझिशनमुळे शरीराला होतात अनेक फायदे!

पाण्यामध्ये मेथीचे दाणे टाकून ते पाणी पिल्याने अपचनाची समस्या दूर होईल. पोटातील गॅस आणि छातीमध्ये होणार कफ मेथी कमी करतं. वाताचा त्रास म्हणजे पाय, सांधेदूखी. वात असणाऱ्यांनी मेथीचं चूर्ण गुळासोबत खावं. उच्चरक्तदाबाच्या समस्येवर मेथी गुणकारी आहे. मेथीचे दाणे रात्रभर गरम पाण्यात ठेवा आणि हे पाणी रोज सकाणी प्या. उच्चरक्तदाब कमी होऊन नियंत्रीत राहिल. गर्भधारणेनंतर त्या महिलेला मेथी खाण्यास दिली जाते. त्यामुळे नवजात बाळासाठी दूध अधिक उत्पन्न होते.

मोहरी

रोजच्या जेवणात मोहरीचा वापर हा होतोच. त्याशिवाय जेवण अधूरं वाटतं. मोहरी म्हणजेच राईचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. मोहरीचं तेल ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्याचा वापर फक्त खाण्यासाठी मर्यादित नसून त्याचे अनेक फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. गळ्याच्या समस्या किंवा टॉन्सिल्ससाठी मोहरीचा काढा घ्यावा.

वाचाः संध्याकाळी रडल्यावर कमी होतो लठ्ठपणा, संशोधनात झालं सिद्ध!

दातांच्या समस्येवरही मोहरी फायदेशीर आहे. मोहरीच्या तेलात मीठ टाकून त्याने दात घासा. दात खराब होणार नाहित, शिवाय चमकदार होतील. दातदुखीवर ही मोहरीचं तेल उपयोगी आहे. मोहरी उष्ण असल्याने संधीवात असल्यास त्याचं तेल नियमित लावावं. मोहरीच्या तेलात भरपूर व्हिटॅमिन्स असतात. ते शरीराचं मेटाबॉलिजम वाढवतात. फोडणीमध्ये एक चमचा मोहरीच्या तेलाचा समावेश करावा. त्यामुळे पचनक्रिया सुधारून पोटाशी निगडीत समस्या कमी होतात. अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असणाऱ्या मोहरीमुळे त्वचेला होणाऱ्या रॅशेस दूर होतात. मोहरीच्या तेलाने मालिश करा.

CCTV VIDEO : हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाचा राडा, 2 डॉक्टरांना केली बेदम मारहाण

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 3, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading