वॉशिंग्टन, 30 ऑक्टोबर : आपल्याला परफेक्ट जोडीदार (perfect life partner) हवा असा प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे ज्यावेळी लग्न ठरवलं जातं तेव्हा अनेक मागण्यांना आपण नकार देतो. शिवाय गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून एकमेकांचं पटत नसेल तर ब्रेकअप होतं आणि आयुष्यात दुसरा बॉयफ्रेंड किंवा दुसरी गर्लफ्रेंड येते. लग्न झालं असेल तर घटस्फोट घेतला जातो आणि त्यानंतर योग्य जोडीदार मिळाला तर लोक दुसरं लग्नही करतात. मात्र त्या जोडीदारासोबतही नाही पटलं तर अशी किती रिलेशन तुम्ही बनवाल किंवा अशी किती लग्न तुम्ही करणार. एक वेळ अशी येते की आपण एकटेच बरे आहोत असंच वाटतं. हो की नाही? मात्र अमेरिकेतील एका महिलेच्या बाबतीत उलटं आहे. तिनं परफेक्ट लाइफ पार्टनर हवा म्हणून तब्बल 10 वेळा लग्न केलीत आणि अजूनही आपल्या आयुष्यातील मिस्टर राइटच्या शोधात आहे.
न्यूयॉर्कमध्ये राहणारी केसी (Cassey) आता 56 वर्षांची आहे. तिनं आपल्याला परफेक्ट नवरा हवा म्हणून 10 वेळा लग्न केलं. अमेरिकेतील Dr. Phil Show या टीव्ही कार्यक्रमात ती यशस्वी उद्योजिका म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले. आपण नुकतंच आपलं दहावं लग्नही मोडलं, असं तिनं या कार्यक्रमात सांगितलं.
The 56-year-old says she’s married all types of men – from a rocker to a preacher, to her high school sweetheart – but she always ends up alone. #DrPhilhttps://t.co/OkJKABJh0C
केसीचं पहिलं लग्न सर्वात जास्त वर्षे म्हणजे 8 वर्षे टिकलं, दुसरं 7 वर्षे आणि तिसरं अडीच वर्षे. त्यानंतर तिनं सात लग्न केलीत. त्यापैकी एक लग्न अगदी कमी वेळेत म्हणजे फक्त 6 महिन्यांतच मोडलं. तिला एका पतीपासून मुलगाही आहे, त्याच्यासोबत तिनं लग्न यासाठी मोडलं कारण त्यानं आपण तुझ्यावर प्रेम करतो असं बोलणं सोडलं होतं. दहाव्या लग्नातही आपण खूश नव्हतो. आपल्या पतीसोबत आपले काही ना काही वाद व्हाययचे. म्हणून आपण हे नातं संपवल्याचं तिनं सांगितलं.
केसी म्हणते, तिनं 10 लग्नं केलेत मात्र आयुष्यात अनेक उतार-चढाव पाहिले. दहा लग्नं करणं हे आपल्यासाठी अभिमानास्पद नाही. मात्र आपण स्वत:ला दुखीही ठेवू शकत नाही. आता आपल्याला हे नातं निभावणं शक्य नाही, असं वाटलं तर असं कोणतंच नातं आपण पुढे कायम ठेवत नाही. केसी थेट आपल्या पार्टनरला आपण आनंदी नाहीत आपल्याला घटस्फोट हवा असं सांगतं.
आपण किती लग्न केले आहेत किंवा किती करणार आहोत याच्याशी आपल्याला काही देणंघेणं नाही. आपल्याला त्यामुळे फरक पडत नाही. आपल्याला फक्त आपल्या मनासारखा जोडीदार हवा आहे, असं ती म्हणाली. आपल्याला आपल्या स्वप्नातील प्रिन्स चार्मिंग नक्कीच मिळेल असा विश्वास तिला आहे.