मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रगत देश असूनही अमेरिकेत वोटिंगसाठी का वापरत नाहीत EVM?

प्रगत देश असूनही अमेरिकेत वोटिंगसाठी का वापरत नाहीत EVM?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (us presidential election) होणार आहे.  मतपत्रिकांमार्फतच मतदान केलं जाणार आहे. या वर्षीच नाही तर अमेरिकत याआधी कधीच EVM चा वापर केला गेला नाही.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (us presidential election) होणार आहे. मतपत्रिकांमार्फतच मतदान केलं जाणार आहे. या वर्षीच नाही तर अमेरिकत याआधी कधीच EVM चा वापर केला गेला नाही.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (us presidential election) होणार आहे. मतपत्रिकांमार्फतच मतदान केलं जाणार आहे. या वर्षीच नाही तर अमेरिकत याआधी कधीच EVM चा वापर केला गेला नाही.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 27 ऑक्टोबर : जगातील 100 हून अधिक देश लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेतात. मात्र त्यापैकी फक्त 25 देशांनी मतदानासाठी इव्हीएमचा (Electronic Voting Machine) वापर केला आहे. त्यात भारतासारखा विकसनशील देशही आहे. मात्र अमेरिकेसारखा प्रगत, महासत्ता असलेला देश नाही. अमेरिकेत आजही ईव्हीएम (EVM) नाहीत तर मतपत्रिकाच (ballet) वापरली जाते. अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी पोस्टल मतदान सुरूही झालं आहे. अमेरिकेत 18 व्या शतकापासून निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातूनच होतं आणि हीच पद्धत तिथल्या लोकांना आवडते. अमेरिकन नागरिक इतर सर्व गोष्टींमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्रणांवर विश्वास ठेवत असले तरीही त्यांना मतदानासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टीत इव्हीएमवर विश्वास नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं त्यांना वाटतं त्याऐवजी मतपत्रिका त्यांना भरवशाची वाटते. आपण दिलं आहे त्याच व्यक्तीला मत मिळतं असा विश्वास त्यांना या पद्धतीत वाटतो. सध्या ई-मेल आणि फॅक्सने जे मत दिलं जातं तेवढंच इलेक्ट्रॉनिक मतदान आहे. यात ई-मेलने मतपत्रिका पाठवली जाते आणि मतदार ई-मेलनेच आपलं मत पाठवू शकतो. इव्हीएम हॅकिंग आणि गडबड होण्याच्या भीतीने पहिल्यांदा नेदरलँडने इलेक्ट्रानिक मतदानावर बंदी घातली. त्यानंतर जर्मनी, इटली, इंग्लंड, फ्रान्स या देशांनीही इव्हीएमवर बंदी घालून मतपत्रिकेद्वारे मतदान सुरू केलं. अमेरिकेत कधीच इव्हीएमचा वापर झाला नाही. हे वाचा - "15 मिनिटांतच कोरोनामुक्त झाला माझा मुलगा", डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा भारतात मतपत्रिका मोजणीला खूप वेळ लागायचा, त्यामुळे 1989 मध्ये भारतात इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने इव्हीएम तयार करायला सुरुवात केली. 1998 मध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या 16 विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी वापरण्यात आलं. 2004 पासून लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा संपूर्ण देशात इव्हीएमचा वापर करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत इव्हीएम वापरलं जातं. हे वाचा - पर्यटकांसाठी खुली झाली Ghost Villages; माणसं येऊ लागली आणि... निवडणुकीत पराभूत झालेला पक्ष अपयशाचं खापर इव्हीएमवर फोडलं जातं आणि मशीन हॅक झालं किंवा गडबड झाली असा संशय घेतला जातो. यावर ‘डेमोक्रसी अट रिस्क, कॅन वुई ट्रस्ट अवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’ या नावाचं एक पुस्तकही आलं आहे. राजकीय पक्षांच्या तक्रारींनंतर  सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा वापर करण्याचा आदेश दिला. त्यामुळे मतदाराने दिलेलं मत त्याच पक्षाला गेलं का हे त्याला पाहता येतं. यामुळे बऱ्याच अंशी शंका दूर होते.
First published:

Tags: US elections

पुढील बातम्या