वॉशिंग्टन, 20 नोव्हेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे वकील रूडी गिउलियानी (Rudy Giuliani) सध्या चर्चेत आले आहेत. याआधी त्यांच्या केसांमधून हेअर डाय निघण्याच्या (Rudy Giuliani's Dripping Hair Dye) व्हिडीओनंतर त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये ते नाक-तोंड पुसताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे ते चांगलेच ट्रोल झाले आहेत.
रूडी गिउलियानी यांचा नाक-तोंड पुसण्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ते आधी आपल्या रूमालानं नाक शिंकरतात आणि तोच रूमाल चेहऱ्यावर फिरवतात म्हणजे त्याच रूमालानं ते चेहरा पुसतात.
रूडी गिउलियानी यांनी ट्रम्प यांच्या अभियानातील अनेक कायदेशीर सल्लागारांसह गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये 2020 साली अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत (2020 US Presidential Election) मतदानात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. याच पत्रकार परिषदेत रूडी गिउलियानी यांच्या केसांमधून डाय निघू लागला. ही पत्रकार परिषद जिथं होती, तिथं खूप उकाडा होता. ज्यामुळे रूडी यांना घाम फुटला होता आणि या घामासोबत त्यांची हेअर डायही निघू लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडीओपाठोपाठच रूडी यांच्या या दुसऱ्या व्हिडीओनं सोशल मीडियावर धूम उडवली. रूडी आपल्या खिशातून रूमाल काढता. त्यानं ते नाक शिंकरतात. थोडा वेळ रूमाल हातात फिरवून ते पुन्हा आपल्या तोंडाजवळ नेतात, त्याच रूमालनं तोंड पुसतात आणि मग संपूर्ण चेहऱ्यावरही तो रूमाल फिरवतात. हा व्हिडीओ पाहून कुणालाही किळसवाणं वाटेल. अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उमटत आहेत.