15 लाख रुपये पगार, इन्शुरन्स आणि फ्री बिअर; चक्क DOG साठी जॉबची ऑफर

15 लाख रुपये पगार, इन्शुरन्स आणि फ्री बिअर; चक्क DOG साठी जॉबची ऑफर

एका कंपनीने डॉगसाठी जॉबची ऑफर (company offer job to dog) दिली आहे. आता ही नोकरी नेमकी आहे तरी काय?

  • Share this:

वॉशिंग्टन, 17 एप्रिल : कोरोना लॉकडाऊनमध्ये (Corona lockdown) अनेकांच्या नोकऱ्या (Job) गेल्या आहेत. काही जणांनी आपलं पोट भरण्यासाठी काही ना काही व्यवसाय सुरू केला आहे. तर काही जण अजूनही नोकरीच्या शोधात आहेत. अशात आता एका कंपनीने जॉबची ऑफर काढली आहे. मात्र हा जॉब तुमच्यासाठी नाही बरं का! तर तुमच्या डॉगसाठी आहे. हो बरोबर वाचलंत डॉगसाठी जॉब (Job for dog) आहे.

अमेरिकेतील कंपनीने ही जॉब ऑफर (US company offer job to dog) देऊ केली आहे. अमेरिकेतील एका बिअर कंपनीने (US beer comapany) डॉगसाठी नोकरीची जाहीरात दिली आहे. याबाबत ट्विटवर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. Busch Beer ही कंपनी एका उत्तम अशा डॉगच्या शोधात आहे. तब्बल 20000 डॉलर्स म्हणजे जवळपास 15 लाख रुपये पगाराची ही नोकरी आहे. शिवाय डॉगचा स्पेशल इन्शुरन्स आणि त्याला फ्री बिअरही देण्यात येईल.

आता तुम्ही म्हणाल या कंपनीत या डॉगचं काम काय असणार. तर या कंपनीने Busch Dog Brew ही डॉगसाठी एक खास बिअर तयार केली आहे. त्यासाठीच कंपनीला एक असा डॉग हवा आहे, जो ही बिअर उत्तम असावी यासाठी मदत करेल. म्हणजे त्याला चिफ टेस्टिंग ऑफिसर पदावर निवडलं जाईल. या कंपनीमार्फत तयार केलेल्या बिअरची चव, गुणवत्ता तपासणं हे त्याचं काम. या कंपनीने डॉगसाठी तयार केलेल्या प्रोडक्टचा तो ब्रँड अॅम्बेसिडरच असेल.

हे वाचा - आयआयटीमध्ये नोकरीची संधी, आजच करा Apply

अल्कोहोल म्हटलं की ते आरोग्यासाठी, शरीरासाठी हानिकारक. त्याचा या प्राण्यांवर काही दुष्परिणाम तर होणार नाही, अशी शंका तुमच्या मनात आली असेल. तर कंपनीने सांगितल्यानुसार याची बिलकुल चिंता करू नका. कारण पॅकेजिंग बिअर कॅनप्रमाणे असेल पण त्यामध्ये डॉगसाठी हेल्थ ड्रिंक आहे. ज्यामध्ये भाज्या, हर्ब्स, मसाले, पाणी आणि पोर्क ब्रोथचा वापर करण्यात आलं आहे. यामुळे डॉगला आवश्यक ते घटक मिळतील. त्यांची पचनप्रणाली चांगली राहिल.

आता नोकरी म्हणजे परीक्षा किंवा मुलाखत हे आलंच. या डॉगच्या बाबतीत तर हे शक्य नाही. मग त्याची निवड कशी केली जाईल आणि यासाठी त्याची क्षमता काय असेल आणि अटी काय आहेत. असे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील.

तर स्पर्धेच्या माध्यमातून या डॉगची निवड केली जाईल. सोशल मीडियावर या कंपनीने स्पर्धा आयोजित केली आहे. यासाछी #BuschCTOcontest हा स्पेश हॅशटॅगही तयार केला आहे.  ही स्पर्धा 28 एप्रिल, 2021 पर्यंत असेल. आता डॉगचे मालक म्हणून तुम्हाला आपल्या डॉगचे सुंदर असे फोटो  या हॅशटॅहसह कंपनीसोबत सोशल मीडियावर शेअर करायचे आहेत आणि तो या नोकरीसाठी का पात्र आहे, हे सांगायचं आहे. पोस्टमधील क्रिएटिव्हीटी आणि वेगळेपण कंपनी पाहिले आणि त्यानुसार आपला निकाल जाहीर करेल.

हे वाचा - OMG! इथं चक्क वाहू लागली दुधाची नदी; भरण्यासाठी लोकांची उडाली झुंबड

कंपनीच्या अधिकृत चॅनेलवर हा निकार जाहीर केला जाईल. कंपनीने ही जाहीरात देताच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Published by: Priya Lad
First published: April 17, 2021, 5:20 PM IST

ताज्या बातम्या