Home /News /lifestyle /

CORONA VACCINE बद्दल धक्कादायक बाब समोर! लस घेताच नर्सला झाला कोरोना

CORONA VACCINE बद्दल धक्कादायक बाब समोर! लस घेताच नर्सला झाला कोरोना

ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाला संशोधनाला मोठा फायदा होणार असून आता भारतासह जगभरात सुरू असलेल्या चाचण्या पुन्हा सुरू होणार आहेत.

ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाला संशोधनाला मोठा फायदा होणार असून आता भारतासह जगभरात सुरू असलेल्या चाचण्या पुन्हा सुरू होणार आहेत.

एकिकडे कोरोना लशीच्या (Corona vaccine) आपात्कालीन वापरासाठी (emergency use) मंंजुरी मिळते आहे, तर दुसरीकडे लशीचे असे भयंकर दुष्परिणाम (corona vaccine side effect) समोर येत आहेत.

    वॉशिंग्टन, 30 डिसेंबर : भारतात कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याबाबत विचार सुरू आहे. असं असताना याआधी इतर देशांमध्ये कोरोना लशीच्या आपात्कालीन मंजुरी दिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. जगात पहिल्यांदाच मंजुरी मिळालेली फायझरची कोरोना लस (Pfizer Coronavirus Vaccine) घेताच एका नर्सला कोरोना झाला (Nurse Got Corona Positive) आहे. फायझरच्या कोरोना लशीला यूके आणि अमेरिकेत मंजुरी देण्यात आलेली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात (California) एका नर्सला ही लस देण्यात आली. मॅथ्यू डब्ल्यू असं नर्सचं नाव. 18 डिसेंबरला फेसबुक पोस्टवर तिनं आपण कोरोना लस घेतल्याचं सांगितलं होतं. एसीबी न्यूजशी बोलताना मॅथ्यूनं सांगितलं, लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या हाताला सूज आली. याशिवाय दुसरा कोणताही दुष्परिणाम झाला नाही. पण सहा दिवसांनी तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. लस घेतल्यानंतर सहा दिवसांनंतरही ती कोव्हिड-19 वॉर्डमध्ये काम करत होती, असं तिनं सांगितलं. ख्रिसमसच्या आदल्या दिवशी तिला थंडी लागू लागली आणि स्नायूंमध्ये वेदना, थकवा जाणवू लागला.  यानंतर तिनं आपली कोरोना चाचणी करून घेतली, ज्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. हे वाचा - ब्रिटनमधील नव्या कोरोनाला टक्कर देणार भारतीय लस; औषध कंपनीकडून मोठा दिलासा तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोना पॉझि़टिव्ह होणं हे आश्चर्यकारक नाही. अमेरिकेच्या सॅन डियागोतील संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ क्रिस्टियन रॅमर्स यांनी सांगितलं, लशीच्या ट्रायलदरम्यान असं दिसून आलं आहे की, लस घेतल्यानंतर 10 ते 14 दिवसांत व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. पूर्ण सुरक्षेसाठी दुसरा डोसही गरजेचा असतो. पहिल्या डोसमुळे जवळपास 50% सुरक्षा मिळते आणि 95% सुरक्षेसाठी दुसरा डोस गरजेचा असतो. हे वाचा - corona ला दूर ठेवण्यासाठी दररोज 5 लिटर पाणी पिणं व्यक्तीच्या जीवावर बेतलं याआधीदेखील फायझरची लस टोचून घेतलेल्यांना साइड इफेक्ट्स झाल्याचं दिसून आले आहेत. विशेषतः अमेरिकेत ज्यांनी फायझरची लस घेतली आहे. त्यातल्या काहींना त्याची अ‍ॅलर्जी दिसायला लागले आहेत. यामुळे जगभरात आता कोरोना लसीकरणाबाबत संशयाचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या