मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /धक्कादायक! Corona vaccine घेतल्यानंतर आणखी एकाचा मृत्यू; ठणठणीत असलेल्या डॉक्टरचा गेला जीव

धक्कादायक! Corona vaccine घेतल्यानंतर आणखी एकाचा मृत्यू; ठणठणीत असलेल्या डॉक्टरचा गेला जीव

कोरोना लशीमुळे (corona vaccine) आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे, असा दावा या डॉक्टरच्या पत्नीनं केला आहे.

कोरोना लशीमुळे (corona vaccine) आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे, असा दावा या डॉक्टरच्या पत्नीनं केला आहे.

कोरोना लशीमुळे (corona vaccine) आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे, असा दावा या डॉक्टरच्या पत्नीनं केला आहे.

वॉशिंग्टन, 08 जानेवारी : कोरोना लशीला (corona vaccine) आपात्कालीन मंजुरी देण्यात आली खरी. पण गेल्या काही दिवसांपासून या लशीचे दुष्परिणामही समोर येत आहेत. विशेषत: फायझरच्या (Pfizer) कोरोना लशीचे गंभीर साइड इफेक्ट्स (corona vaccine side effect) दिसत आहेत. पोर्तुगालमध्ये ही लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आता ही लस घेणाऱ्या अमेरिकेतील  एका डॉक्टरचा मृत्यू (doctor died) झाला आहे आणि त्याच्या पत्नीनंही याचं खापर कोरोना लशीवरच फोडलं आहे.

मियामी शहरातील 56 वर्षांचे डॉ. मायकेल ग्रेगरी 18 डिसेंबर, 2020 ला कोरोना लशीचा डोस देण्यात आला. माऊंट सिनाई मेडिकल रुग्णालयात त्यांनी लस घेतली. त्यांची पत्नी हेईदी नेकेलमाननं सांगितलं लस घेण्यापूर्वी ते ठणठणीत होते, त्यांना कोणता आजारही नव्हता. ते धूम्रपानही करायचे नाही, मद्यपान करायचे. पण ते नियमित व्यायाम करायचे.  लस घेतल्यानंतर त्यांच्या रक्तात काहीतरी गडबड झाल्याचं दिसून आलं.

16 दिवसांनंतर रविवारी अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रोगप्रतिकारक क्षमतेशी संबंधित दुर्मिळ आजार झाला आणि त्यानंतर हार्ट अटॅक आला. फायझरच्या कोरोना लशीमुळेच हा आजार झाल्याचा दावा हेईदीनं केला आहे. डेली मेलनं याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा - नव्या स्ट्रेनचा धसका! तिसऱ्या कोरोना लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी

मिळालेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये तात्काळ साइड इफेक्ट दिसला नाही. मात्र तिसऱ्या दिवशी अंघोळ करताना त्यांच्या त्वचेवर लाल चकत्या उमटल्या. माऊंट सिनाई मेडिकल रुग्णालयात त्यांनी आपली चाचणी करून घेतली तेव्हा त्यांच्या शरीरातील प्लेलेट्स सुरुवातील झिरो प्लेटलेट्स दाखवले आणि त्यानंतर पुन्हा केलेल्या चाचणीत फक्त एक प्लेटलेट्स शिल्लक होता.

दरम्यान फायझर कंपनीनं ग्रेगरी यांचा मृत्यूचा कोरोना लशीशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय याबाबत अधिक तपास करत असल्याचंही त्यांनी सांगतिलं.

फायझरची लस घेतल्यानंतर मृत्यू झालेलं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी पोर्तुगालमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा लस घेताच 48 तासांतच  मृत्यू झाला आहे.  41 वर्षीय सोनिया असेवेडो ( Sonia Acevedo)  यांनी लस घेतली त्यानंतर तिच्यामध्.े कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आलेनाही. मात्र अचानक मृत्यू झाला.  ती पोर्तो शहरातील पोर्तुगीज इन्स्टिट्युट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये काम करत होती.

हे वाचा - मेड इन चायना कोरोना लशीचे 73 Side effect; चिनी डॉक्टरनंच केली पोलखोल

याआधी मेक्सिकोमध्ये डॉ. कार्ला यांना कोरोना लस दिल्यानंतर त्यानंतर त्यांना आधी त्वचेचं इन्फेक्शन झालं आणि नंतर लकवा मारला. अर्ध्या तासात त्यांच्या शरीरावर चकत्या पडल्या, त्यांना अशक्तपणा आला. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं.  फिनलँडमध्ये पाच लोकांमध्ये लशीचे गंभीर दुष्परिणाम दिसले होते. ब्रिटनमध्येही दोन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरावर लाल निशाण दिसू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) संपूर्ण जगात या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिलेली आहे. आता लशीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर फाइझरनं अॅलर्जी असलेल्या लोकांना कोरोना लशीच्या वापराबबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

First published:

Tags: Corona, Corona vaccine