वॉशिंग्टन, 17 जानेवारी : दारू (alcohol) न पिता फक्त केक (cake) खाल्ल्यानं नशा... कसं काय शक्य आहे? कदाचित त्या केकमध्ये दारू टाकली असावी. असंही तुम्हाला वाटलं असेल. पण तसं बिलकुल नाही. दारूचा एक थेंबही पोटात न जाता फक्त केक खाऊनच या व्यक्तीला दारूपेक्षाही जास्त नशा चढते. अमेरिकेतील (america) या 62 वर्षांच्या व्यक्तीला एक विचित्र अशी समस्या आहे.
निक कार्सन. ज्यांना दारू न पिताही नशा चढते, तेदेखील केक खाऊन आणि असं होण्याचं कारण म्हमजे त्यांना असलेला एक डिसऑर्डर. निक यांना ऑटो ब्रवुेरी सिंड्रोम आहे. ज्यामुळे केक खाल्ल्याने त्यांच्यावरील नियंत्रण सुटतं. एखादी व्यक्ती दारू प्यायल्यानंतर कशी करू लागते अगदी तसंच तेही करू लागतात.
ऑटो ब्रवुेरी सिंड्रोम यामध्ये कार्बोहायड्रेसयुक्त कोणतेही पदार्थ खाल्ल्यानं नशा चढते. म्हणजे केकच नाही तर थोडीशी शुगर किंवा कोणतंही कार्बोहायड्रेट्स घेतल्यावर त्यांना ही समस्या उद्भवते. या समस्येत कार्बोहायड्रेस अल्कोहोलमध्ये बदलतात. ही समस्या खूपच गंभीर आहे. कारण थोडासा जरी केक खाल्ला तरी काही मिनिटांत इतकी नशा चढते की दारू पिऊनही तितकी चढणार नाही.
आता या आजाराचं नेमकं कारण काय? तर निक 20 वर्षांपूर्वी एका स्ट्राँग केमिकल्सच्या संपर्कात आले होते. तेव्हापासून त्यांना हा आजार झाला.
हे वाचा - OMG! छातीवर कान, हात ठेवण्याची नाही गरज; डोळ्यांनीच दिसतं मुलीचं धडधडतं हृदय
निक आपल्याला असलेल्या या समस्येशी लढा देत आहेत. ते किटो डाएटवरच राहण्याचा प्रयत्न करतात. ज्यामध्ये कार्बोहायड्रेट कम आणि प्रोटिन फॅट्स जास्त प्रमाणात असतं. शिवाय आपण शरीरात चांगले बॅक्टेरिया निर्माण करण्याचाही प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त निसर्गावर अवलंबून राहतो असंही त्यांनी सांगितलं. शिवाय त्यांना नेहमी आपल्यासोबत एक ब्रेथ अॅनालयाझर ठेवावं लागतं जेणेकरून ते नशेत केव्हा आहेत हे त्यांना समजेल. या समस्येबाबत मला माहिती असल्यानं आता मी ही परिस्थिती कशी हाताळायची हे चांगलंच ओळखतो त्यामुळे मला थोडं सोपं जातं असं निक म्हणाले.
हे वाचा - 8 पदार्थ खाताना काळजी घ्या! नाहीतर शरीरात घुसेल मेंदूवर परिणाम करणारा कीडा
निक यांच्या या विचित्र आजाराला लोक हसण्यावर घेतात पण आपण किती कठीण परिस्थितीतून जात आहोत ते आपल्याला माहिती असं निक सांगतात. आपल्याला आवडीचं काहीच खायला मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आज तकच्या रिपोर्टनुसार लँड बायबलशी बोलताना निक म्हणाले, माझी ही अशी स्थिती पाहून लोकांना मजा वाटते. कारण ड्रिंक्स न करता फक्त काहीतरी खाल्ल्यानं मी नशेत जातो आणि मला हे खूप स्वस्त पडतं, असं ते म्हणातात. पण माझ्यासाठी हे चांगलं नाही. यामुळे मी माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.