Home /News /lifestyle /

आजीने दिला आपल्याच नातीला जन्म; 'गे' मुलासाठी झाली 61 व्या वर्षी आई

आजीने दिला आपल्याच नातीला जन्म; 'गे' मुलासाठी झाली 61 व्या वर्षी आई

मानवी नातेसंबंधातली गुंतागुंत कधीकधी अजब रंग दाखवते. आतातर प्रगत तंत्रज्ञानामुळे ही नात्यांची गुंतागुंत आणखी वाढली आहे.

    न्यूयॉर्क, 9 डिसेंबर: मानवी नातेसंबंधातली गुंतागुंत कधीकधी अजब रंग दाखवते. आतातर प्रगत तंत्रज्ञानामुळे ही नात्यांची गुंतागुंत आणखी वाढली आहे.  अमेरिकेतील (US) नेब्रास्का (Nebraska) राज्यात असाच प्रकार समोर आला आहे. या राज्यातल्या एका 61 वर्षांच्या महिलेने तिच्याच नातवंडाला जन्म दिला आहे. सेसिल एलेग असं त्या महिलेचं नाव असून त्यांनी आपल्या समलिंगी (gay) मुलासाठी सरोगेट मदर (Surrogacy) होत आपल्याच  नातीला जन्म दिला आहे. आजी कशी झाली आई? सेसिल यांचा मुलगा मॅथ्यू एलेग हा समलैंगिक किंवा गे आहे. मॅथ्यू आणि त्याचा जोडीदार एलियट डर्फिट यांना मूल हवं होतं. त्यावेळी सेसिल यांनीच त्यांच्यापुढे सरोगसीच्या माध्यमातून आपण आई होण्यास तयार असल्याचे सांगितलं. सेसिल यांनी 59 व्या वर्षी हा प्रस्ताव ठेवल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला तो गांभीर्याने घेतला नाही. एलेग कुटुंबाच्या जवळच्या एका डॉक्टरांनी हा चांगला प्रस्ताव असू शकतो, सुरक्षितही असू शकतो, असं सांगितल्यानंतर सर्वांनी याचा गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली. यासंदर्भातलं वृत्त बीबीसीने दिलं आहे. कसा झाला 61व्या वर्षी मातृत्वाचा प्रवास? सेसिल यांच्या अनेक प्रकारच्या टेस्ट डॉक्टरांनी सुरुवातीला केल्या. सेसील यांची तब्येत उत्तम असल्याने मुल गर्भात ठेवण्यास कोणताही त्रास होणार नसल्याचा त्यांना विश्वास होता. गर्भावास्थेमध्ये कोणताही विशेष त्रास झाला नसल्याचं सेसिल यांनी यावेळी सांगितलं. सेसिल यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या जवळची विशेषत:  मुलगा मॅथ्यूची भावडं सुरुवातीला चकित झाली होती. मात्र, संपूर्ण परिस्थिती समजल्यानंतर त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. ‘सेसिल या निस्वार्थी महिला आहेत’, अशी भावना मॅथ्यूचा जोडीदार एलिएट डफर्टीने व्यक्त केली आहे. अमेरिकेतील नेब्रास्का राज्यात 2015 सालीच समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र तरीही सेसिल यांना प्रेगन्सीच्या दरम्यान विमा कंपन्यांनी संरक्षण कव्हर दिले नाही. या प्रकरणात त्यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. सेसिल यांच्या नातीचे नाव उमा लुईस असे ठेवण्यात आले आहे. बाळांतपणाणंतर सेसिल आणि त्यांची नात दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले. सेसिल यांचा मुलगा मॅथ्यूला चार वर्षांपूर्वी समलैंगिक जोडीदाराशी लग्न केल्याबद्दल नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या परिवाराने या पक्षपाती धोरणाच्या विरोधात जोरदार मोहिम उघडली होती. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Relationship

    पुढील बातम्या