समुद्री जीवाच्या पाठीवर TRUMP लिहिणारा कोण? शोधणाऱ्याला मिळणार 3 लाख

समुद्री जीवाच्या पाठीवर TRUMP लिहिणारा कोण? शोधणाऱ्याला मिळणार 3 लाख

वन्यजीव विभागानं त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे, ज्यानं समुद्री जीवाच्या पाठीवर ट्रम्प लिहिण्याची (trump on-sea-mammal) हिंमत केली. त्यांना तुमचीही मदत हवी आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 12 जानेवारी :  एखादी हरवलेली व्यक्ती, फरार झालेला आरोपी शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळत असल्याचं तुम्हा सर्वांना माहितीच आहे. पण आता अशा व्यक्तीचा शोध सुरू आहे, ज्यानं एका समुद्री जीवाच्या पाठीवर ट्रम्प (TRUMP) असं लिहिलं आहे. असं लिहिणारा कोण आहे, त्याचा शोध अमेरिकेत (America) सुरू झाला आहे.

अमेरिकेतील एका समुद्री जीवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत  एक भलामोठा समुद्री जीव दिसतो आहे. ज्याच्या पाठीवर ट्रम्प असं लिहिलं आहे. या जीवाच्या पाठीवर ट्रम्प हे नेमकं कसं लिहिण्यात आलं आणि कुणी लिहिलं हे अद्याप माहिती नाही.  यूएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसनं (us fish and wildlife service) या प्रकरणी तपास सुरू केला आहे.  त्यामुळे जो कुणी त्या आरोपीला शोधून देईल त्याला बक्षीस देण्यात येणार आहे.

एरिझोनातील सेंटर फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटीनं सांगितलं की, या समुद्री जीवाच्या पाठीवर ट्रम्प कुणी लिहिलं हे जो सांगेल, त्या व्यक्तीला जो शोधून देईल त्याला 5000 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास  3 लाख रुपये दिले जातील.

हे वाचा - बर्ड फ्लूला घाबरू नका, फक्त ही काळजी तेवढी घ्या, पशुसंवर्धन विभाग काय म्हणतो पहा

हा समुद्री जीव खूपच दुर्लभ असल्याचं सांगितलं जातं आहे. हा समुद्री जीव शाकाहारी असतो. त्याचं शरीर अवाढव्य असलं तरी तो अतिशय शांत आहे. त्यामुळे त्याला समुद्री गाय म्हणूनही ओळखलं जातं.

अमेरिकेच्या फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, या समुद्री जीवाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. पण अमेरिकन सरकार अशा प्राण्यांची सुरक्षा करतं. गेल्या काही वर्षात या जीवाच्या संख्येत वाढ झाली आहे.  1991 साली फ्लोरिडातील या समुद्री जीवांची संख्या 1267 होती, जी आता  6300 झाली आहे.

हे वाचा - अरे बापरे! 3114154015... महिन्याचं अब्जावधीचं Electricity bill; ग्राहकाला शॉक

आज तकच्या रिपोर्टनुसार एखाद्या प्राण्याच्या शरीरावर डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव लिहिण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीदेखील असा प्रयत्न झाला आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये गेल्या वर्षी ट्रम्प 2020 असा स्टिकर एका अस्वलाच्या पाठीवर चिकटवण्यात आला आला होता. त्यानंतर पर्यावरण तज्ज्ञांनी टीकाही केली होती.

Published by: Priya Lad
First published: January 13, 2021, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading