कोरोना रुग्णांसाठी सलग 260 दिवस ऑनड्युटी; एकही सुट्टी न घेणाऱ्या कोरोना योद्धा डॉक्टरला सॅल्युट!

हॉस्पिटलमधून घरी गेल्यावरही त्यांचा जास्तीत जास्त वेळ फोनवरून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात जातो. त्यांना जेवायलाही वेळ मिळत नाही.

हॉस्पिटलमधून घरी गेल्यावरही त्यांचा जास्तीत जास्त वेळ फोनवरून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात जातो. त्यांना जेवायलाही वेळ मिळत नाही.

  • Share this:
वॉशिंग्टन, 14 डिसेंबर : आपण फक्त 8-9 तास, आठवड्याला एक किंवा दोन सुट्ट्या,शिवाय मध्ये कधी ना कधी काही कारणांनी रजाही टाकतो. मात्र तरी शारीरिक थकवा आणि मानसिक ताण जाणवतो. पण सध्या कित्येक कोरोना योद्धा कोरोना रुग्णांसाठी दिवसरात्र झटत आहेत. कित्येक तास काम करत आहेत. कुटुंबासाठी वेळ देणं दूरची गोष्ट पण त्यांना स्वतःलाही वेळ देता येत नाही. थोडा आराम करण्यासाठी सुट्टी घेता येत नाही आहे. तुम्ही विश्वास ठेवणार नाही मात्र अशाच एका कोरोना योद्धा डॉक्टरनं स्वतःला कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी इतकं झोकून दिलं आहे की 260 दिवस ते सलग काम करत आहेत. त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. अमेरिकेतील नॉर्थ ह्यूस्टनमध्ये (North Huoston) युनाइटेड मेमोरियल या छोट्या हॉस्पिटलमध्ये गरीबांवर उपचार केले जातात. इथले चीफ ऑफ़ स्टाफ डॉ. जोसेफ वरोन सध्या चर्चेत आहेत. डॉ. जोसेफ वरोन (Dr. Joseph Varon) यांनी थँक्सगिव्हिंग डेच्या निमित्तानं एका वयस्कर कोविड रुग्णाला (Covid-19) प्रेमाने मिठी मारतानाचा फोटो प्रसिद्ध झाला. त्यानंतर न्यूज़ एजन्सी एएफपीनी डॉक्टरांबद्दल माहिती घेतली आणि थेट त्यांना गाठलं. तिथं गेल्यावर एजन्सीच्या वार्ताहराला कळालं की डॉ. जोसेफ गेले 260 दिवस एकही सुट्टी न घेता कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. तो 260 वा दिवस होता. त्यांनी सांगितलं की, हॉस्पिटलमधून घरी गेल्यावरही त्यांचा जास्तीत जास्त वेळ फोनवरून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात जातो. त्यांना जेवायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे जेव्हा कुणी त्यांच्यासमोर काही खाण्यासाठी आणतं तेव्हा ते खाऊन घेतात कारण पुन्हा रुग्णांच्या उपचारांत व्यस्त झाल्यावर जेवायला वेळ मिळेल की नाही, हे सांगू शकत नाही.  त्यामुळेच त्यांचं वजन 15 किलोंनी वाढल्याचंही ते हसत सांगतात. हे वाचा - धक्कादायक! प्लाझ्मा चढवताच कोरोना रुग्णाचा मृत्यू; पोस्टमॉर्टेममध्ये मोठा खुलासा जुलै महिन्यात रुग्णांची संख्या सतत वाढत होती त्यामुळे डॉक्टर आणि त्यांच्या रुग्णालयातील नर्स खूप थकल्या होत्या. त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं की नर्स इतक्या थकल्या आहेत की कोणत्याही क्षणी त्यांना रडू कोसळेल. कोरोनाच्या रुग्णांना बरं करण्याच्या लढाईत इथले कर्मचारी थकून गेले आहेत त्यामुळे ते निराश झाले होते असंही त्यांनी सांगितलं होतं. कोविड वॉर्डमधील सगळे बेड रुग्णांनी भरले आहेत. कर्मचारी रुग्णांची काळजी घेतात आणि डॉक्टर जोसेफ रोज कोविड वॉर्डमध्ये राउंड घेतात. वॉर्डमध्ये माणसांना स्पर्श करण्यास परवानगी नसल्याने खूप एकाकीपणा आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आपले मोठे फोटो तिथे लावले आहेत त्यामुळे रुग्ण त्यांना ओळखू शकतात.
Published by:Priya Lad
First published: