Home /News /lifestyle /

मुक्या जीवांना आगीतून वाचवण्यासाठी पोलिसांनी लावली जीवाची बाजी; Burning house मधील बचावकार्याचा थरारक VIDEO

मुक्या जीवांना आगीतून वाचवण्यासाठी पोलिसांनी लावली जीवाची बाजी; Burning house मधील बचावकार्याचा थरारक VIDEO

पेटत्या घराच्या इथं दोन कुत्रे अडकले आहेत हे पाहताच मागचा पुढचा कोणताही विचार न करता पोलिसांनी तिथं धाव घेतली.

  वॉशिंग्टन, 15 जानेवारी : यूएसमधील (United States) फ्लोरिडातील (Florida) एका जळत्या घराजवळ (burning house) पोलिसांनी दोन कुत्र्यांना वाचवलं आहे,  बर्निंग हाऊसमधून कुत्र्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यांचे हे धाडस कॅमेऱ्यात कैद झालं आणि दुर्घटनेनंतर हा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral) होतो आहे. शनिवारी रात्री पॉस्को काऊंटीतील (Pasco County) मून लेक परिसरात आग लागली. एका घरानं पेट घेतला. तेव्हा Pasco County Sheriff’s Office च्या डेप्युटींनी  घटनास्थळी धाव घेतली. तिथं कुणी नाही ना याची ते खात्री करत होते. तिथं माणसं तर नाही पण त्यांना दोन मुके जीव दिसले. दोन कुत्रे तिथंच फिरत होते. पेटत्या घरापासून अवघ्या काही अंतरावरच... त्यांना पाहताच या पोलिसांनी कसलाच विचार न करता तिथं धाव घेतली आणि त्या कुत्र्यांना वाचवलं.

  त्यांच्या युनिफॉर्मला असलेल्या कॅमेऱ्यात हे बचावकार्य कैद झालं.  ABC News नं शेअर केलेल्या या  व्हिडीओत पाहू शकता ते पोलीस कुत्र्यांना त्या जळत्या घरापासून दूर रस्त्यावर घेऊन येतात. हे वाचा - 5 रुपयाचं पेन असावं तसा 25 हजारांचा मोबाईल घेऊन पसार; VIDEOत पाहा चोराचा प्रताप Pasco County Sheriff’s Office ने ही संपूर्ण घटना फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही सांगितली आहे, "शनिवारी रात्री मून लेक परिसरात एका घराला आग लागल्यानंतर पॉस्को शेरीफचे डेप्ट्युटी तिथं पोहोचले. तिथं पोहोचताच एका डेप्युटीनं त्या घरातील सर्व लोक बाहेर पडले आहेत आणि सर्व सुरक्षित आहेत ना याची तात्काळ खात्री करून घेतली" "सर्व काही सुरळीत आहे की नाही हे पाहत असताना त्यांना तिथं दोन कुत्रे दिसले. त्यावेळी मागचा पुढचा कोणताही विचार न करता बर्निंग हाऊसच्या अगदी जवळ असलेल्या या कुत्र्यांकडे ते गेले आणि त्यांना तिथून सुरक्षित जागी नेलं. या कुत्र्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. त्यांना त्यांच्या मालकांकडे सोपवण्यात आलं आहे. जीव कुणाचाही असो मग तो प्राणी का असेना त्याच्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे", असंही शेरीफ ऑफिसनं म्हटलं आहे. हे वाचा - अपंग असली तरी घाबरली नाही, हिम्मतीनं भिडली, एका हातानं परतवला बिबट्याचा हल्ला पोलिसांनी केलेलं हे बचावकार्य पाहून सर्वजण त्यांचं कौतुक करत आहेत. म्ही दिलेल्या या सेवेबाबत तुमचे खूप धन्यवाद, तुमच्यासारखेच अधिक लोक आम्हाला हवेत अशा बऱ्याच प्रतिक्रिया सोशल मीडियावर  उमटत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Social media viral, Viral, Viral videos

  पुढील बातम्या