Home /News /lifestyle /

पगार नाही तर फक्त टिपमुळे आजोबा झाले लखपती; Pizza Delivery साठी मिळाली 9 लाख रुपये टिप

पगार नाही तर फक्त टिपमुळे आजोबा झाले लखपती; Pizza Delivery साठी मिळाली 9 लाख रुपये टिप

Pizza Delivery करून इतकी टिप मिळाली यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. मात्र ही टिप नेमकी कशासाठी देण्यात आली आहे एकदा वाचाच.

    उटाह, 03 ऑक्टोबर : आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेल वेटरला टिप (Tip) देतो. शिवाय आपल्या घरी ऑनलाइन ऑर्डर देऊन येणाऱ्यालाही टिप देतो. ही टिप फार फार तर किती असेल शंभर, दोनशे, तीनशे... पण आपण ऑर्डर केलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमीच की नाही. पण अमेरिकेतील एका  89 वर्षांच्या आजोबांच्या बाबतीत हे उलटं ठरलं आहे. कदाचित त्यांना जितका पगारही नसेल तितकी त्यांना टिप मिळाली आहे. 89 वर्षांचे डेरलिन नीवी (Derlin Nivi) यांना पिझ्झा डिलीव्हरीसाठी तब्बल 12000 डॉलर्स म्हणजे 9 लाख रुपये टिप मिळाली आहे. डेरलिन नीवी आठवडाभर जवळपास 30 तास पिझ्झा डिलीव्हरी करतात. काही आठवड्यांपूर्वी ते 32  वर्षांची ग्लॅडी वाल्डेज यांच्या घरी पाइन अॅपल पिझ्झा घेऊन गेले. ग्लॅडीने दरवाजा उघडताच डेरलिन यांनी त्यांना हाय गॉर्जस असं म्हटलं. ग्लॅडीचं कौतुकही केलं.  ग्लॅडीला हे खूपच आवडलं. ग्लॅडीने आपला पती कार्लोस वाल्डेजला या डिलीव्हरी मॅनबाबत सांगतिलं. कार्लोस यांना डेरलिनचा स्वभाव, प्रामाणिकपणा तर आवडलाच. मात्र या वयातही पिझ्झा डिलीव्हरीसारखं काम ते करत आहेत, याचं कौतुक वाटलं. कार्लोस यांनी आपल्या दरवाजाजवळ असलेल्या कॅमेऱ्याच्या फुटेजमधील डेरलिन यांचा व्हिडीओ आपल्या टिकटॉकवर पोस्ट केला. त्यांच्या फॉलोअर्सनादेखील डेरलिन आवडले. डेरलिनसाठी हजारो मेसेज आले. वाल्डेज कुटुंबाने यानंतर कित्येक वेळा पिझ्झा ऑर्डर केला आणि त्यांनी डिलीव्हरीसाठी डेरलिन यांनाच पाठवावं यावर जोर दिला. जेव्हा जेव्हा डेरलिन डिलीव्हरीसाठी आले तेव्हा तेव्हा वाल्डेज कुटुंबाने त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला. हे वाचा - हा चहावाला नेमकं वापरतो तरी काय? टपरीवर विकतोय 1000 रुपयाला एक कप चहा कार्लोस वाल्डेज यांना या डिलीव्हरी बॉयसाठी काहीतरी करायचं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या टिकटॉक पेजवर क्राऊड फंडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. फक्त 24 तासांतच एक हजार डॉलरपेक्षा अधिक पैसे जमा झाले. एकूण 12 हजार डॉलर्स जमा झाले. त्यानंतर वाल्डेज स्वत: त्यांच्या घरी गेले आणि एका रिकाम्या पिझ्झा बॉक्समधून 12000 डॉलर दिले. पिझ्झाचा बॉक्स खोलतात डेरलिन यांच्या डोळ्यात पाणी आलं. डेरलिन नीवी यांनी सीएनएनशी संबंधित केएसएल टीव्हीशी बोलताना सांगितलं, नोकरीनंतर त्यांना कधीच सामाजिक, आर्थिकरित्या सुरक्षित वाटलं नाही. मात्र कार्लोस यांच्या एका पावलामुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. हे वाचा - जाल्यान गावली सोन्याची मासोली; आजीबाई एका दिवसात झाली लखपती लोकांना नीवी यांना आणखी मदत करायची आहे. यासाठी वाल्डेज यांनी एक वेनमो अकाऊंट तयार केलं आहे. जिथं थेट नीवी यांना मदत देता येईल.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या