मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Happy Birthday, Momsy! उर्वशी रौतेलानं आईला दिला GOLD CAKE; पाहा VIDEO

Happy Birthday, Momsy! उर्वशी रौतेलानं आईला दिला GOLD CAKE; पाहा VIDEO

उर्वशी रौतेलाची (urvashi rautela) फक्त आईच नाही तर तिचे चाहतेही असं गिफ्ट पाहून सरप्राइझ झाले.

उर्वशी रौतेलाची (urvashi rautela) फक्त आईच नाही तर तिचे चाहतेही असं गिफ्ट पाहून सरप्राइझ झाले.

उर्वशी रौतेलाची (urvashi rautela) फक्त आईच नाही तर तिचे चाहतेही असं गिफ्ट पाहून सरप्राइझ झाले.

मुंबई, 02 डिसेंबर : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कायम चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांवरून, तर कधी आणखी कोणत्या कारणांवरून. या वेळी ती चर्चेत आहे तिच्या मातृप्रेमामुळे. तिची आई मीरा रौतेला (Meera Rautela) यांचा वाढदिवस नुकताच झाला. त्या निमित्ताने उर्वशीने त्यांना सरप्राइज म्हणून चक्क खऱ्या सोन्याचा वर्ख असलेला केक (Real Gold Plated Cake) भेट दिला. तोच केक त्यांनी वाढदिवसाला कापला. त्याबद्दलची पोस्ट उर्वशीने इन्स्टाग्रामवर एक जानेवारीला शेअर केली होती. २४ तासांच्या आत साडेसहा लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे.

उर्वशीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत उर्वशी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये, तर तिची आई काळ्या रंगाच्या गाउनमध्ये दिसत आहे. त्या दोघींच्या समोरच्या टेबलवर खऱ्या सोन्याचा वर्ख असलेला केकही दिसत आहे.

या फोटोबरोबर उर्वशीने लिहिलेली कॅप्शन अशी - 'खऱ्या सोन्याचा वर्ख असलेला केक देऊन मी माझ्या आईला वाढदिवसाचं सरप्राइज दिलं. आई, तुझ्याशिवाय मी काहीच नाही; पण तू माझ्यासोबत असलीस तर मी काहीही होऊ शकते. दर दिवशी तुला धन्यवाद द्यावेत, असं मला दररोज सकाळी उठताना वाटतं. माझ्यावर असीम प्रेम करणाऱ्या तुझं मार्गदर्शन, तुझ्या प्रेमाची ऊब माझ्यासोबत कायम असते. माझ्या हृदयात तुझी असलेली जागा कोणीही घेऊ शकत नाही. मी कुठेही गेले किंवा मला कोणीही भेटले, तरी माझ्यासाठी तू कायमच 'नंबर वन' असशील. हॅपी बर्थडे आई....'

या फोटोवर इन्स्टाग्रामवरच्या तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. 24 तासांच्या आत साडेसहा लाखांहून अधिक जणांनी हा फोटो लाइक केला आहे.

हे वाचा - आलिया-रणबीर एंगेजमेंटसाठी नव्हे यासाठी गेले होते राजस्थानात, PHOTO आले समोर

यापूर्वी उर्वशी एका लग्नात तिने नेसलेल्या साडीमुळे चर्चेत आली होती. सांची या स्टायलिस्टने डिझाइन केलेल्या त्याची साडीची किंमत पाच लाख रुपये होती, तर त्यावर तिने परिधान केलेल्या ज्वेलरीची किंमत 15 लाख रुपये होती. त्याआधी नेहा कक्करच्या लग्नात तिने डिझायनर रेणू टंडनने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. तो लेहंगा आणि ज्वेलरीची किंमत जवळपास 55 लाख रुपये होती.

First published:
top videos

    Tags: Urvashi rautela