Love Story : घराण्याशी वैर असलेल्या मुलीशी सौरव गांगुलीनं केलं लग्न

Love Story : घराण्याशी वैर असलेल्या मुलीशी सौरव गांगुलीनं केलं लग्न

भारताचा माजी क्रिकेट कप्तान सौरभ गांगुलीचं लग्न एकदम थरारकच झालं होतं. त्यानं आपल्या शत्रूच्या कुटुंबातल्या मुलीशी लग्न केलं आणि कोणाला कळलंही नाही.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल : भारताचा माजी क्रिकेट कप्तान सौरभ गांगुलीचं लग्न एकदम थरारकच झालं होतं. त्यानं आपल्या शत्रूच्या कुटुंबातल्या मुलीशी लग्न केलं आणि कोणाला कळलंही नाही. नंतर मात्र मोठा हंगामा झाला.

सौरव गांगुलीनं डोनाशी लग्न केलं. ती प्रसिद्ध नृत्यांगना आहे. सौरव आणि डोना एकमेकांचे शेजारी होते. दोन्ही कुटुंबात अनेक वर्षांचं शत्रुत्व होतं. ते एकमेकांकडे बघायचेही नाहीत. दोन्ही घरांमध्ये उंच भिंती होत्या. काळ पुढे जात होता. दोन्ही घरांमधली कटुता वाढतच चालली होती. पण तरीही सौरव आणि डोना यांची आँखमिचोली सुरू झालीच.

गुपचूप गाठीभेटी आणि वडिलांचा राग

सौरव आणि डोना भेटायला लागले. सौरव शाळेतून पळून डोनाच्या शाळेत तिला भेटायला जायचा. डोना गुपचूप त्याची मॅच पाहायला यायची. एकदा सौरवच्या वडिलांना ही गोष्ट कळली. त्यांनी रागानं थैमान घातलं. सौरवला डोनाला न भेटण्याची तंबी दिली. पण सौरवनं ठरवूनच टाकलं होतं की लग्न करीन ते डोनाशीच.

लग्नाचा सिक्रेट प्लॅन

याच काळात सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट संघात आपलं स्थान बळकट केलं होतं. 1996मध्ये इंग्लडविरुद्धच्या सामन्यात लाॅर्डसवर टेस्ट क्रिकेटमध्ये सौरवनं  शतक ठोकलं आणि हिरो बनला. बंगालमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. तो कोलकत्त्याला परतला तेव्हा डोनानं त्याच्यावर लग्नासाठी जोर टाकला. सौरवनं गुपचूप लग्न करण्याचा प्लॅन आखला.

मित्राच्या घरी आला मॅरेज रजिस्ट्रार

एका मित्राच्या घरी मॅरेज रजिस्टारला बोलावलं होतं. त्याच्या समोर दोघांनी एकदुसऱ्यांना हार घातले आणि साइन केली. रजिस्टारनं औपचारिकपणे सांगितलं, आता ते कायद्यानं पती-पत्नी आहेत. या गुपचूप केलेल्या लग्नानंतर सौरव श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला.

लग्नाची बातमी लीक झाली

दोघांनी ठरवलं होतं की दौऱ्याहून परतल्यावर लग्नाची बातमी सगळ्यांना देऊ. पण कसं कोण जाणे ही बातमी लीक झाली. कोलकत्त्यात बातमी छापली गेली. दोन्ही कुटुंबं रागानं लाल झाली. पण लग्न तर झालं होतं. आता काहीच करू शकत नव्हतं कुणी. नंतर कोलकत्यात शानदार पार्टी देण्यात आली. सौरव भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी कप्तान आहे. बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्षही आहे.

- संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

First published: April 11, 2019, 7:47 PM IST
Tags: love story

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading