विदुर नीती : श्रीमंत होण्यासाठी 'या' गोष्टी न विसरता करा

विदुर नीती : श्रीमंत होण्यासाठी 'या' गोष्टी न विसरता करा

महाभारतात महात्मा विदुर हस्तिनापुरातल्या धृतराष्ट्राचे मंत्री होते. त्यांनी कौरव आणि पांडवांना बऱ्याच नीतिमत्तेच्या आणि धार्मिक गोष्टी शिकवल्या. विदुरांनी श्रीमंत कसं बनायचं हेही सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 9 मार्च : महाभारतात महात्मा विदुर हस्तिनापुरातल्या धृतराष्ट्राचे मंत्री होते. त्यांनी कौरव आणि पांडवांना बऱ्याच नीतिमत्तेच्या आणि धार्मिक गोष्टी शिकवल्या. विदुरांनी श्रीमंत कसं बनायचं हेही सांगितलं.

विदुर नीतीनुसार ज्यांना धन हवं, त्यांनी कधीही घाई गडबड करू नये. या लोकांनी धैर्यानं आणि शांततेनं काम करायला हवं. एकाग्रतेनं काम केलं तर चुका कमी राहतात.

विदुर नीतीनुसार तुम्हाला पैसे हवे असतील तर आॅफिसमध्ये कुठल्याच सहकाऱ्याबद्दल, ईर्ष्या, असुया ठेवू नका. कारण मनात याच गोष्टी सुरू झाल्या की मग स्वत:च्या कामाकडे फोकस राहात नाही. दुसऱ्याकडे लक्ष दिल्यानं आपलं काम बिघडतं.

विदुर नीती सांगते तुम्ही निर्भय बना. कारण पैसे मिळवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. पण मनात भीती असेल तर निर्णय कसे घेणार? म्हणून मनातली भीती काढून टाका. आपल्या संपत्तीची गुंतवणूक योग्य प्रकारे करा.

विदुर नीती एक महत्त्वाची गोष्टही सांगते. ज्यांच्याकडे संपत्ती आहे, त्यांनी आळस झटकून टाका. आळशी माणसं परिश्रम करत नाहीत. त्यांच्याकडे लक्ष्मी टिकत नाही. त्यामुळे आळस सोडणं गरजेचं आहे.

विदुरांनी सांगितलेल्या या गोष्टी या काळातही लागू होतात, हे महत्त्वाचं. काळ बदलला तरी नीती तीच राहते. जगातले श्रीमंत व्यक्ती हे आजही काम करतात.

बिल गेट्सची सकाळ व्यायामानंच सुरू होते. ट्रेड मिलवर एक तास काढताना ते काही शैक्षणिक डीव्हीडीजही पाहतात. ते म्हणतात नाश्त्याला ते Coca Puffs cereal घेतात. पण त्यांची पत्नी मेलिंडा सांगते, ते ब्रेकफास्ट घेत नाहीत.

ट्विटरचा संस्थापक जॅक डोर्सीची सकाळ सुरू होते पहाटे 5 वाजता. उठल्या उठल्या तो 30 मिनिट्स मेडिटेशन करतो. त्यानंतर 7 मिनिटांचे असे तीनदा वर्कआऊट्स करतात. मग काॅफी घेऊन तो ईमेल्सना उत्तर द्यायला बसतो.

Akash-Shloka Wedding: लग्नमंडपाकडे दणक्यात निघाली आकाशची वरात

First published: March 9, 2019, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading