रूक जाओ! बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचली गर्लफ्रेंड; अचानक मारली एंट्री आणि...

रूक जाओ! बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचली गर्लफ्रेंड; अचानक मारली एंट्री आणि...

एरवी फिल्ममधील लग्नात पाहायला मिळणारा हा सीन रिअल लाइफमध्येही घडला आणि मग तिथं कसा गोंधळ झाला ते वाचा.

  • Share this:

लखनऊ, 09 डिसेंबर : रूक जाओ ये शादी नहीं हो सकती! फिल्ममधील हिरो किंवा हिरोईननं आपल्या गर्लफ्रेंड (girlfriend) किंवा बॉयफ्रेंडचं (boyfriend) दुसऱ्या सोबत लग्न (wedding) होत असताना लग्नाच्या मध्येच अचानक एंट्री मारणं आणि लग्न थांबवणं. ऑनस्क्रिन पाहिलेला हा सीन रिअल लाइफमध्येही पाहायला मिळाला तो उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh). बॉयफ्रेंडच्या लग्नात गर्लफ्रेंड पोहोचली आणि तिनं तिथं चांगलाच गोंधळ घातला आहे.

यूपीच्या (UP) उन्नावमध्ये राहणारा नवरा लखनौतल्या मऊ गावात वरात घेऊन आला. वरानं वधू एकमेकांना वरमाला घालणार इतक्यात एका मुलीनं तिथं अगदी फिल्मी स्टाइल एंट्री मारली. तिला पाहताच नवरदेवाची बोबडीच वळली त्याला घाम फुटला. कारण ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नाही तर त्याची गर्लफ्रेंड होती.

बॉयफ्रेंडच्या लग्नात अचानक येऊन तिनं चांगलाच गोंधळ घातला. भरमंडपात तिनं त्याला सुनावलं. आपल्याजवळील कोर्टाची कागदपत्रंही तिनं दाखवली आणि लग्न थांबवलं. गर्लफ्रेंडनं फक्त आपल्या बॉयफ्रेंडचं लग्न मोडलं नाही तर त्याला कारमध्ये बसवलं आणि आपल्यासोबत पळवून नेलं. वधूऐवजी नवऱ्याचीच पाठवणी झाली आणि नववधूला घेण्यासाठी वाजतगाजत आलेली वरात तशीच परतली.

हे वाचा - बॉयफ्रेंडच्या लग्नामुळे सुडानं पेटली गर्लफ्रेंड; नव्या नवरीच्या डोळ्यात फेविक्विक टाकत कापले केस

आज तकच्या रिपोर्टनुसार वधूचे वडील रामेश्वरम यांनी सांगितलं, नवरा आणि त्या मुलीमध्ये जे काही मतभेद होते ते आमच्यासमोर मिटले आणि लग्न थांबवण्यात आलं. याबाबत कुणीही पोलीस तक्रार केलेली नाही. पोलिसांनीदेखील अशी काही तक्रार आली नसल्याचं सांगितलं आहे आणि अशी तक्रार आल्यास कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच बिहारमध्येही अशीच एक घटना घडली होती. बॉयफ्रेंडनं दुसऱ्या मुलीशी लग्न करताच गर्लफ्रेंड सुडाच्या भावनेनं पेटून उठली आणि लग्नाच्या दिवशीच मध्यरात्री बॉयफ्रेंडच्या घरात घुसून नववधूच्या डोळ्यात फेविक्विक टाकलं आणि तिचे केसही कापले होते. यानंतर तरुणीला नातेवाईकांनी पकडलं आणि तिला मारहाण केली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणीला ताब्यात घेतलं आहे.

Published by: Priya Lad
First published: December 9, 2020, 9:35 PM IST

ताज्या बातम्या