भारतातला हा बीच पाहिल्यावर गोवा काय फॉरेनचे समुद्रही विसराल

या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला तलाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 04:35 PM IST

भारतातला हा बीच पाहिल्यावर गोवा काय फॉरेनचे समुद्रही विसराल

समुद्र किनारी फिरायला जायचं म्हटलं की, डोळ्यासमोर सर्वातआधी येतं ते गोवा. यामुळेच गोव्यात तुम्हाला नेहमीच गर्दी दिसेल. पण तुम्हाला जर शांत समुद्र किनारा, उसळणाऱ्या लाटा आणि अविस्मरणीय क्षण अनुभवायचे असतील तर या ठिकाणाला भेट द्याच. इथे आल्यावर तुम्ही गोव्याला पूर्ण विसराल यात तिळमात्र शंका नाही. चला तर मग ती जागा कोणती ते जाणून घेऊ...

वर्कला, केरळ- कोल्लम शहरापासून 30 किमी दूर वर्कला वसलेलं आहे. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे इथेही सुंदर आणि स्वच्छ बीच आहेत, जे अजूनपर्यंत पर्यटकांना फारसे माहीत नाही. त्यामुळेच वर्कलाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे.

या ठिकाणी एकदा गेल्यानंतर तुम्ही इकडचं निसर्ग सौंदर्य आयुष्यभर विसरू शकणार नाही. डोंगर आणि समुद्र यांचा अप्रतिम संगम पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.

सिवागिरिपत्ती- वर्कलामध्ये फक्त बीचच नाहीयेत तर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. सिवागिरिपत्ती इथे फिरायला जाण्यासाठी बाइक भाड्याने घेतली जाऊ शकते. बाइकवरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येऊ शकते.

सिवागिरी मठ- वर्कला स्थानकापासून दोन किमी अंतरावर समाज सुधारक नारायण गुरू यांची समाधी आहे. या सिवागिरी मठात ठराविक वेळेसाठीच त्यांच्या समाधीचं दर्शन घेता येतं.

Loading...

जनार्दन स्वामी क्षेत्र- विष्णूचं हे मंदिर सुमारे 2 हजार वर्ष जुनं आहे. या मंदिरात जाण्यासाठी खूप पायऱ्या चढाव्या लागतात.

कापिल बीच- या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला तलाव आहे. समुद्र आणि तलाव एक होतात म्हणून इथे पोहणं धोकादायक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...