मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता Bachelor पुरुष कोरोनाच्या टार्गेटवर; संशोधनात धक्कादायक माहिती समोर

आता Bachelor पुरुष कोरोनाच्या टार्गेटवर; संशोधनात धक्कादायक माहिती समोर

महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका जास्त आहे, हे याआधी अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. मात्र आता याबाबत केलेल्या संशोधनात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका जास्त आहे, हे याआधी अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. मात्र आता याबाबत केलेल्या संशोधनात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका जास्त आहे, हे याआधी अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. मात्र आता याबाबत केलेल्या संशोधनात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Priya Lad
स्टॉकहोम, 15 ऑक्टोबर : पुरुष आणि महिलांचा विचार केला असता कोरोनाव्हायरसचा (coronavirus) सर्वात जास्त धोका पुरुषांना (men) आहे हे आतापर्यंत अनेक अभ्यासात दिसून आलं आहे. आकडेवारीनुसारदेखील महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाची लागण होण्याची प्रकरणं अधिक आहे. मात्र आता आणखी एक धक्कादायक संशोधन समोर आलं आहे, ते म्हणजे अविवाहित पुरुषांना (unmarried men) कोरोनाचा धोका विशेषत: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका सर्वात जास्त आहे. स्वीडनच्या स्टॉकहोम युनिव्हर्सिटीमधल्या (Stockholm University in Sweden) संशोधकांनी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा अभ्यास केला.  स्वीडिश नॅशनल बोर्ड ऑफ हेल्थ आणि वेलफेअरमध्ये (Swedish National Board of Health and Welfare) नोंद झालेल्या कोरोना रुग्णांचा अहवाल त्यांनी तपासला. यामध्ये 20 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या  विवाहित, अविवाहित घटस्फोटित, विधवा या सर्वांचा समावेश होता. जनरल नेचर कम्युनिकेशनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. न्यूज मे़डिकल लाइफ सायन्सने याबाबत वृत्त दिलं आहे. लग्न न झालेल्या पुरुष आणि महिलांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका विवाहितांच्या तुलनेत दीडपटीने जास्त आहे. त्यातही पुरुषांना सक्वात जास्त धोका आहे. अविवाहित महिलांच्या तुलनेत अविवाहित पुरुषांना सर्वात जास्त धोका आहे.  महिलांपेक्षा पुरुषांमध्ये त्यांची शारीरिक रचना आणि राहणीमान यामुळे त्यांच्या मृत्यूदराचं प्रमाण अधिक असल्याचं संशोधकांनी सांगितलं. या संशोधनाचे मुख्य संशोधक गन्नर अँडरसन यांनी सांगितलं, कमी शिक्षण आणि राहणीमान त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती देखील याला कारणीभूत  आहे. शिक्षणाचा अभाव, कमी उत्पन्न, बेरोजगारी, अधिक काळ अविवाहितपणा अशा काही कारणांमुळे विषाणूची लागण होऊन मृत्यूचा धोका वाढतो, असं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं आहे. हे वाचा - पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका पण महिलांनी घेतला धसका; काय आहे कारण वाचा दरम्यान पुरुषांंना कोरोनाचा धोका सर्वाधिक असला याबाबत सर्वात जास्त चिंता महिलांना आहे. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या Yougov survey नुसार 64% फ्रेंच महिलांना आपल्याला कोरोनाव्हायरस होण्याची आणि संक्रमण पसरण्याची चिंता आहे. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण  50 टक्के आहे. कॅनडातही मार्चमध्ये 49 टक्के महिला तर 30 टक्के पुरुषांमध्ये कोरोनाची चिंता अधिक होती. अमेरिकेच्या डार्टमाऊथ कॉलेजमधील संशोधकांनी ऑगस्टच्या मध्यात प्रसिद्ध केलेल्या  नुसारदेखील कोरोना महासाथीमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये चिंता अधिक आहे. अमेरिकेच्या राजकारण आणि लिंग या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. जूनमधील सर्वेक्षणानुसार जर सरकारने कोणतीही बंधनं ठेवली नाही तर  37 टक्के पुरुष  दैनंदिन जीवन सुरू करण्यास तयार आहेत. मात्र महिलांमध्ये हे प्रमाण 24 टक्के आहे. हे वाचा - सर्वात पहिल्या लशीसाठी भारतीय राणीने लावली होती जीवाची बाजी; अशी केली जनजागृती त्यामुळे पुरुषांना जरी कोरोनाचा धोका असला तरी याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो आहे. त्यामुळे महिलांनी आपली अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या