Elec-widget

LIVE TV वर रिपोर्टरला केलं किस, व्हिडीओ झाला व्हायरल

LIVE TV वर रिपोर्टरला केलं किस, व्हिडीओ झाला व्हायरल

रिपोर्टरने स्वतः तिच्या ट्विटर अकाउंटवरून घटनेचा व्हिडीओ शेअर केला.

  • Share this:

अमेरिकेतील कंटकी येथील लोइसविले एका महिला न्यूज रिपोर्टरला लाइव्ह टीव्हीव किस करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक वृत्तवाहिनी वेब-3 मध्ये काम करणाऱ्या सारा रिवेस्ट या रिपोर्टरने तिच्यासोबत घडलेला अनुभव सांगितला.

wave3.com ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 42 वर्षीय एरिक गुडमॅन असं या आरोपीचं नाव आहे. 21 सप्टेंबरला सारा Bourbon & Beyond उत्सवाच्या बाहेर सारा रिपोर्टिंग करत होती, तेव्हा ही घटना घडली. रिपोर्टरने स्वतः तिच्या ट्विटर अकाउंटवरून घटनेचा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वेब-3 वाहिनीने हा मुद्दा उचलून धरला. दरम्यान प्रकरणाची चर्चा अधिक होत असल्याचे कळल्यावर आरोपीने लिखित स्वरुपात माफीनामा दिला.

Loading...

यानंतर साराने त्याचा माफीनामा स्वीकारल्याचेही म्हटलं. पण असं असलं तरीही त्याच्यावर औपचारिकता म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे. घडलेल्या घटनेच्या व्हिडीओत स्पष्ट दिसतं की, अज्ञात व्यक्तिच्या किस करण्यानंतर हसत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तिने असंही म्हटलं की जे घडलं ते योग्य नाही.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 30, 2019 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...