पाकिस्तानातल्या हिंदुकुश पर्वतांत राहते गूढ जमात; पारंपरिक सणांमधूनही दिसतो मुक्त समाज

पाकिस्तानातल्या हिंदुकुश पर्वतांत राहते गूढ जमात; पारंपरिक सणांमधूनही दिसतो मुक्त समाज

हजारो वर्षं जुनी परंपरा जपत असला तरी आधुनिक काळात भारतातही नाही इतका खुलेपणा आणि मुक्त समाज तिथे आहे. पाकिस्तानमध्ये 2018पर्यंत या समुदायाला मान्यता नव्हती. जेमतेम 3800 लोकसंख्या असलेल्या या समाजाचा सध्या मोठा सण सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : पाकिस्तानमधील(Pakistan) अल्पसंख्याक समाजाची संख्या खूप कमी प्रमाणात आहे. पाकिस्तानमध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणावर असून त्याखालोखाल विविध जाती धर्मांचे नागरिक राहत आहेत. परंतु पाकिस्तानमधील एक समुदाय मागील काही वर्षांपासून मुख्य प्रवाहापासून खूप वेगळी राहत असून हिंदकुश पर्वतरांगेत हा समुदाय असून मागील अनेक दशकांपासून ते याठिकाणी राहत आहेत. त्यांच्या परंपरा देखील खूप वेगळ्या असून याठिकाणी मुलाला आणि मुलीला पूर्णपणे कौटुंबिक स्वातंत्र आहे. महत्त्वाचे म्हणजे या समुदायाची लोकसंख्या केवळ 4 हजार इतकी असून कमी लोकसंख्या असताना देखील त्यांनी आपली संस्कृती जपली आहे.

कलाश(Kalaash) असे या समुदायाचे नाव असून मुख्य प्रवाहापासून लांब राहून त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपली आहे. सध्या ते आपला सर्वात मोठा सण चेमॉस (Chawmos) साजरा करत आहेत. हिंदकुश पर्वतात मागील काही दशकांपासून राहत असल्यानं त्यांच्या संस्कृतीचे रक्षक झाल्याचं ते मानतात. त्याचबरोबर या भागाला कौकासोश इन्दिकौश असे म्हटले जात असे. म्हणजेच युनानी भाषेत याचा अर्थ हिंदुस्थानी पर्वत असा होत असल्याने त्यांचा संदर्भ हिंदू धर्माशी देखील लावण्यात येत होता. तसेच या समुदायाला सिकंदराचा वंश देखील म्हटले जाते. या ठिकाणी पावलेल्या व्यक्तीला वाजतगाजत आणि दारू पीत निरोप दिला जातो. देवाच्या मर्जीने आलेला व्यक्ती त्याच्याच मर्जीने मरण पावल्याची श्रद्धा याठिकाणी असून व्यक्ती मरण पावल्यानंतर येथील लोकं रडत नाहीत.

पाकिस्तानमध्ये समुदायाला नव्हती मान्यता

पाकिस्तानमध्ये 2018पर्यंत या समुदायाला मान्यता नव्हती. परंतु 2018 मध्ये पहिल्यांदा यांची जनगणनेमध्ये स्वतंत्र समुदाय म्हणून मोजणी करण्यात आली. यामध्ये त्यांची लोकसंख्या 3800 असून सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने हे साजरे करतात. उत्सव आणि सणाच्या दिवशी पुरुष आणि महिला एकत्र दारू पिऊन आनंद साजरा करतात. त्याचबरोबर या समुदायाला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील इतर समुदायाकडून धोका असल्याने ते पारंपरिक शस्रांबरोबरच आधुनिक शस्र देखील जवळ बाळगतात. माती आणि लाकडापासून तयार करण्यात आलेल्या घरांमध्ये येथील लोकं राहतात.

स्त्रिया चालवतात घर

या समुदायाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील महिला संपूर्ण घरचा कारभार पाहतात. पुरुष केवळ महिलांनी तयार केलेल्या वस्तू बाजारात विक्रीचे काम करतात. महिला शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करतात. तर विविध प्रकारच्या पर्स आणि रंगीत माळा देखील तयार करतात. त्याचबरोबर येथील महिलांना नटण्याचा शौक असल्याने त्यांची खास टोपी आणि रंगीत माळा या महिला नटण्यासाठी वापरतात.

सणांमधे होतात निवडणुका

या समुदायामध्ये वर्षाला तीन सण साजरे केले जातात. या महिन्यात त्यांचा सर्वात मोठा सण चेमॉस (Chawmos) साजरा केला जात आहे. Camos, Joshi आणि Uchaw असे तीन मोठे सण वर्षभरात साजरे केले जातात. चेमॉस (Chawmos) हा सण मंदिरामध्ये साजरा केला जातो. यावेळी पुरुष महिलांना ब्रेड बनवून देतात. त्यांचा हा सण संपूर्ण 14 दिवस साजरा केला जातो. यामध्ये महत्त्वाची प्रक्रिया ही शुद्धीकरण असून सणाच्या दिवसांमध्ये फळ आणि सुकामेवा गिफ्ट म्हणून दिला जातो.

जोडीदार निवडण्यास स्वातंत्र्य

याठिकाणी मुलाला आणि मुलीला पूर्णपणे कौटुंबिक स्वातंत्र आहे. मुलाला आणि मुलीला जोडीदार निवडण्यास स्वातंत्र्य असून कोणताही जोडीदार त्या निवडू शकतात. महत्त्वाचं म्हणजे विवाहित महिला देखील दुसरा पुरुष निवडण्याचे स्वातंत्र असून त्या त्याच्याबरोबर राहायला जाऊ शकतात. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार न्यूज 18 मधील रिपोर्टनुसार येथील मुली सणाच्या दिवशी मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंद करून काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वेगळे राहण्यास जातात. त्यानंतर ते परत आल्यानंतर त्यांचे लग्न लावून दिले जाते आणि ते एकमेकांबरोबर राहण्यास तयार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळं कुटुंब त्यांच्यावर कोणताही दबाव टाकत असून त्यांना जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र आहे.

महिलांवर काही बंधन देखील

या समुदायामध्ये महिलांना स्वातंत्र्य असलं तरीदेखील मासिक पाळीच्या काळात महिलांना घरात राहण्यास परवानगी नाही. या महिलांना कम्युनिटी होममध्ये राहण्यास लागत असून या ठिकाणी असणारे कम्युनिटी होम खूप उत्तम अवस्थेत आहेत. पाच दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर येथील महिला तिथेच अंघोळ करून आणि फ्रेश होऊन घरी येतात. या महिला ज्या घरांमध्ये राहतात त्यांना बशाली घर म्हटलं जात असून तेथील भितींना देखील शिवण्यास परवानगी नाही.

First published: December 30, 2020, 9:44 AM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading