मुंबई 25 मे : मूल जन्माला आल्यानंतर मिळालेलं नाव ही त्या बाळाची पहिली ओळख असते. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात तर नावाला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच बाळाचं नाव ठेवताना खूप विचार केला जातो. पूर्वीच्या काळात देवीदेवता, राजेमहाराजे यांची नावं मुलांना देत असत. त्यानंतर फुलांची नावं, देशातल्या नद्या किंवा पूर्वजांची नावं मुलांना ठेवली जात. आता नावांमध्ये खूप वैविध्य आलं आहे. प्रत्येकालाच आपल्या बाळाचं नाव ‘हटके’ असावं असं वाटतं. भारतीय क्रिकेटपटूंनीही त्यांच्या मुलांची अशी हटके नावं ठेवली आहेत. त्यावरून तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अनोखी नावं सुचू शकतील. ‘डीएनए’नं त्या संदर्भात वृत्त दिलं आहे.
भारतीय क्रिकेटपटू, सेलिब्रेटी त्यांच्या मुलांची नावं हटके ठेवतात. काही जण उगाचच वेगळेपणासाठी अर्थ नसलेले शब्द शोधून काढतात, पण काही नावं मात्र खरोखरच छान असतात. त्यांना अर्थही असतो व ती उच्चारायलाही सहज-सोपी असतात. तुम्हीही अशा नावांच्या शोधात असाल, तर क्रिकेटपटूंच्या मुलांची ‘ही’ काही नावं तुम्हाला नक्कीच आवडतील.
लहान बाळांना का घालतात चांदीचे दागिने? या गोष्टींचा त्यांच्या वाढीला होतो फायदा
झिवा : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या मुलीचं नाव झिवा असं ठेवलंय. याचा अर्थ जीवाचं एक रूप. त्याशिवाय प्रतिभा, चमक, प्रकाश किंवा ईश्वराचा प्रकाश असेही याचे काही अर्थ आहेत.
ग्रेसिया : सुरेश रैनानं त्याच्या मुलीसाठी भारतीय नाही, तर इंग्रजी नाव शोधलं आहे. त्यानं त्याच्या मुलीचं नाव ग्रेसिया असं ठेवलंय. मात्र या नावाचा खूप छान अर्थ आहे. त्याचा अर्थ आहे उपकार आणि आशीर्वाद.
आर्यवीर आणि वेदांत : वीरेंद्र सेहवागला 2 मुलं आहेत. त्यांची नावं त्यानं आर्यवीर आणि वेदांत अशी ठेवली आहेत. आर्यवीरचा अर्थ आहे महान, तर वेदांत म्हणजे हिंदू धर्मातलं वेदशास्त्र. आत्मसाक्षात्काराचा वैदिक विधी, वेदांचं ज्ञान असणारे, धर्मशास्त्र, प्रमुख सत्य, हिंदू दर्शन, सर्वांचा राजा असेही याचे इतर काही अर्थ आहेत.
समायरा : रोहित शर्माच्या मुलीचं नाव समायरा असं आहे. करामती, देवांचं संरक्षण मिळालेली, संरक्षक, मध्यरात्र असे या नावाचे काही अर्थ आहेत.
जोरावर : शिखर धवननं त्याच्या मुलाचं नाव जोरावर असं ठेवलंय. याचा अर्थ आहे ताकद, मजबूत.
अयान : युसूफ पठाणनं त्याच्या मुलाचं नाव अयान असं ठेवलंय. हे अरबी भाषेतलं नाव असून त्याचा अर्थ ‘देवानं दिलेली भेट’ असा होतो.
हिनाया : हरभजनसिंहनं त्याच्या मुलीचं नाव हिनाया असं ठेवलंय. याचा अर्थ चमकदार, चमकणारी, सुंदर, परी आणि अभिव्यक्ती असा आहे.
भारतीय क्रिकेटपटूंनी ठेवलेल्या नावांमध्ये तुम्हाला नक्कीच काही चांगली नावं सापडली असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Small baby