मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरेरे! आता साधी Underwear ही मिळेना; सुटाबुटात राहणाऱ्या इंग्रजांवर ओढावली अशी वेळ

अरेरे! आता साधी Underwear ही मिळेना; सुटाबुटात राहणाऱ्या इंग्रजांवर ओढावली अशी वेळ

इंधनानंतर यूकेमध्ये आता कपड्यांचाही तुटवडा (Underwears Pajamas Shortage In UK).

इंधनानंतर यूकेमध्ये आता कपड्यांचाही तुटवडा (Underwears Pajamas Shortage In UK).

इंधनानंतर यूकेमध्ये आता कपड्यांचाही तुटवडा (Underwears Pajamas Shortage In UK).

  • Published by:  Priya Lad

लंडन, 08 ऑक्टोबर :  फॉर्मल पँट-शर्ट, त्यावर कोट, गळ्यात टाय आणि पायात बूट... असा इंग्रजांचा रूबाबदार पोशाख. पण सुटाबुटात राहणाऱ्या इंग्रजांना आता एका साध्या चड्डीसाठीही धडपड करावी लागते आहे. यूकेमध्ये (UK) कपड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अगदी साधी अंडरविअर आणि पायजमाही मिळेना झाल्या आहे  (Underwears Pajamas Shortage In UK). अगदी तिप्पट, चौपट किंमतीने हे कपडे खरेदी कऱण्याची वेळ ब्रिटिशांवर ओढावली आहे.

यूकेमध्ये याआधी इंधनाचं संकट ओढावल्याचं आपल्या सर्वांना माहितीच आहे. आता तर त्यांच्यावर कपड्याचंही संकट ओढावलं आहे.  दुकानात अंडरविअर्स, हाफ पॅंट्स आणि पायजम्यांची कमी आहे. या तुटवड्याचं कारण आहे ते ब्रिटनमध्ये आलेलं वादळ.

खराब वातावरणामुळे ब्रिटनमधील कापसाच्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे कापसाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक दर कापसाला आहे. तब्बल 40 पट दर वाढले आहेत. याशिवाय कोरोनामुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे शिपिंग कंटेनर्सचे दरही भरमसाठ वाढले आहेत. यामुळे अनेक भागात कपड्यांचा तुटवडा आहे.

हे वाचा - Shocking! Bum lift करताच तरुणीचा मृत्यू; नको त्या हौशेपोटी गमावला जीव

मागणीनुसार पुरवठा होत नाही आहे. परिणामी किमती वाढल्या आहेत. एका अंडरविअर रिटेलरने सांगितलं की सणासुदीच्या काळात हा तुटवडा चिंतेचा आहे. आता विक्रीचं सीझन होतं. पण कपडे कमी असल्याने ग्राहकांना तसंच परतावं लागत आहे. जितका माल शिल्लक आहे, तो जास्त किमतीत विकणं ही त्यांची गरज आहे.  त्यामुळे दुकानदर दुप्पट नव्हे तर तिप्पट, चौपट किमतीने कपडे विकत आहेत. अगदी 100 रुपयांना असलेले कपडे 400 रुपयांना खरेदी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ख्रिसमस जवळ येत असल्याने आता बॉक्सर्स, लॉन्जरी आणि पायजम्यांच्या किमती आणखी वाढतील.

हे वाचा - Virgin BF चा जोश GF ला पडला भारी! लैंगिक संबंधादरम्यान भिंतीत अडकलं तरुणीचं डोकं

यूकेमध्ये फक्त या क्षेत्रातच नाही तर बहुतेक क्षेत्रांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यूकेतील प्रसिद्ध पजामा कंपनी हॅप्पी लिननचे मुख्य मार्क ग्रीन यांनी सांगितलं की आता देश खाण्यापिण्याच्या समस्यांचाही सामना करतो आङे. लवकरच सर्वकाही ठिक होईल, अशी अपेक्षा आहे.

First published:

Tags: Lifestyle, Uk