मुंबई, 04 डिसेंबर : कोरोनाग्रस्त (coronavirus) व्यक्ती शिंकताना, खोकताना त्या व्यक्ती अधिक संपर्कात आल्यास तसंच त्या व्यक्तीनं शिंकताना, खोकताना तोंडावर ठेवलेला हात इतर वस्तूंना लावल्यास आणि त्या वस्तूंना इतर व्यक्तींनी स्पर्श केल्यास किंवा ती व्यक्ती शिंकताना, खोकताना त्याचे थेंब पृष्ठभागावर पडून तिथं दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श झाल्यास... अशा पद्धतीनं कोरोनाव्हायरस पसरत जातो. मात्र आता हवेमार्फत पसरणाऱ्या कोरोनाचा (Aerosolised Coronavirus) धोकाही नाकारता येत नाही. म्हणजे कोरोनाव्हायरस असलेले तोंडातील ड्रॉपलेट्स हवेत विशिष्ट कालावधीसाठी राहतात आणि विशिष्ट ठिकाणापर्यंत तरंगत जातात. ज्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो. या कोरोनाचा नाश कसा करायचा असा प्रश्न उपस्थित होतोच.
सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखलं जातं. मात्र घरामध्ये ते शक्य नाही. अशावेळी एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना विषाणूला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे.
सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी शतकांपासून नेहमीची यूव्हीसी प्रक्रिया वापरली जाते पण त्यामुळे मोतीबिंदू किंवा त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. मात्र त्या तुलनेत कमी क्षमतेची far-ultraviolet C (UVC) सुरक्षित असल्याचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत. कमी क्षमतेचं फार-अल्ट्राव्हायोलेट लायटिंग C (UVC) वापरल्यास खोलीतील हवा निर्जंतुक करता येऊ शकते ज्यामुळे रुममध्ये व्हेंटिलेशनमुळे होणाऱ्या निर्जंतुकीकरणाच्या तुलनेत 50 ते 85 टक्क्यांची वाढ होऊ शकते असं कॉमप्युटेशनल मॉडेलिंगच्या माध्यमातून लक्षात आलं आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
हे वाचा - CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार ; Secret Wuhan files मधून पितळ उघड
यूकेतील क्रॅनफिल्ड विद्यापीठातील लिआंग यांग हे या अभ्यासातील एक अभ्यासक आहेत. ते म्हणाले, "जिथं सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार नाही अशा बंद खोल्यांमध्ये कोरोना विषाणू एअरोसोलच्या माध्यमातून पसरून संक्रमित करू शकतो"
सध्या नेहमीच्या पद्धती स्वच्छता, जनजागृती यांवर भर दिला जात आहे. फार-यूव्हीसी लायटिंगमुळे सुरक्षित, कमी खर्चिक पद्धतीने SARS-CoV-2 चं संक्रमण रोखण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. हॉस्पिटल्स, वैद्यकीय सेवा केंद्र अशा ठिकाणी सी (यूव्हीसी) चा निर्जंतुकीकरणासाठी वापर करता येऊ शकतो.
आम्ही अशा पद्धतीनं हवेतील विषाणूंचा नाश करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. जिथं हवा खेळती राहू शकत नाही तिथं फार-यूव्हीसी इल्युमिनेशनचा संक्रमण रोखण्यासाठी तितकाच उपयोग होईल जितका N95 मास्कचा होतो, असं संशोधकांनी सांगितलं.
हे वाचा - मास्क वापरण्याबाबत WHO ने नियम केले कठोर; पालन न केल्यास...
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियेशनमधून निघणाऱ्या तीन प्रकारच्या किरणांपैकी दृष्य किरणांपेक्षा कमी वेव्हलेंग्थ असलेल्या किरणांतून येणाऱ्या प्रकाशाला यूव्हीसी लाइट म्हणतात. यूव्हीए आणि यूव्हीबी यापेक्षा यूव्हीसीची वेव्हलेंग्थ कमी असते. माणसासाठी सुरक्षित असलेल्या फार-यूव्हीसीची वेव्हलेंग्थ 207 ते 222 nm दरम्यान असते. विशेष बल्ब आणि लँप वापरून ही वेव्हलेंग्थ निर्माण करता येते आणि संक्रमण रोखता येतं. फार-यूव्हीसी सुरक्षित आहे कारण कमी वेव्हलेंग्थच्या यूव्हीसीच्या तुलनेत अधिक योग्यपणे कार्य करते. पण ती माणसाच्या पेशींना धोका पोहोचवू शकत नाही. याबाबत अधिक संंशोधन असल्याचंही संशोधकांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.