• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • दुसऱ्याला उलटी करताना पाहून महिलेला भरते धडकी; पाहताच येतो पॅनिक अटॅक

दुसऱ्याला उलटी करताना पाहून महिलेला भरते धडकी; पाहताच येतो पॅनिक अटॅक

फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असतं. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त पाण्याची गरज नसते पण, फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्यामुळे आपल्याला उलटी किंवा मळमळ असा त्रास होऊ शकतो.

फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असतं. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त पाण्याची गरज नसते पण, फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्यामुळे आपल्याला उलटी किंवा मळमळ असा त्रास होऊ शकतो.

या महिलेला उलटीची भीती (fear of vomit) वाटते.

 • Share this:
  ब्रिटन, 03 मे : एखादी व्यक्ती उलटी (Vomit) करत असेल तर त्या व्यक्तीला पाहून आपल्यालाही उलटीसारखं वाटतं किंवा आपल्यालाही उलटी होणं, हे नवं नाही. म्हणजे अनेकांच्या बाबतीत असं होतं. पण दुसऱ्याला उलटी करताना पाहून पॅनिक अटॅक (Fear of Vomit) येणं म्हणजे थोडं विचित्र आहे की नाही. पण आपल्याला विचित्र वाटणाऱ्या या परिस्थितीचा सामना करते आहे ती यूकेतील एक महिला. वेल्समध्ये राहणारी  35 वर्षांच्या एम्मा डेव्हिएस. तिला दुसऱ्याला उलटी करताना पाहून तिला धडकीच भरते, तिच्या हृदयाचे ठोके वाढतात. दरदरून घाम फुटतो आणि पॅनिक अटॅक येतो. कारण एम्माला उलटीची भीती वाटते. आता उलटीची भीती हा काय प्रकार आहे असा प्रश्नही तुम्हाला पटले. एम्माला एमेटोफोबिया (Emetophobia) हा एक मानसिक आजार आहे. फोबिया म्हणजे अति भीती. या भीतीवर नियंत्रण ठेवणं अशक्य आहे. कुणाला उंचीचा फोबिया असतो, कुणाला विमानात बसण्याचा फोबिया असतो, कुणाला गर्दीचा फोबिया असतो. असे एक ना दोन तर फोबियाचे कितीतरी वेगवेगळे प्रकार आहेत. हे वाचा - अजबच आहे! महिलेलाही माहिती नाही ती होती प्रेग्नंट; आकाशातच जन्माला आलं बाळ एमेटोफोबियामुळे एम्माचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. द सनच्या रिपोर्टनुसार उलटी पाहून एम्माची प्रकृती इतकी गंभीर होते की तिला दिवसातून सहा पॅनिक अटॅक येतात. काम करताना पॅनिक अटॅक यायचा. ऑफिसला जाताना बसमध्येही तिला पॅनिक अटॅक आला होता. यामुळे तिला नोकरीही सोडावी लागली. उलटीच्या भीतीमुळे ती गेल्या दोन वर्षांपासून घरातून बाहेर पडली नाही. अगदी तिचे वडील ज्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर होता आणि हॉस्पिटलमध्ये होते. त्यांचा मृत्यू झाला, तेव्हाही ती शेवटची भेटू शकली नाही. हे वाचा - डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? 'हे' उपाय ठरतील प्रभावी पण एम्माच्या या अशा परिस्थितीत तिचं कुटुंब तिच्यासोबत आहे. तिची आई, आजी आणि मुलंही तिला साथ देतात. आपण आपल्या भीतीवर एक दिवस तरी नक्कीच मात करू, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: