Home /News /lifestyle /

घशात खवखव म्हणून गरम पाण्याच्या गुळण्या करत राहिली; मेडिकल रिपोर्ट पाहून हादरली तरुणी

घशात खवखव म्हणून गरम पाण्याच्या गुळण्या करत राहिली; मेडिकल रिपोर्ट पाहून हादरली तरुणी

महिलेला टॉन्सिलची समस्या होती. यामुळेत घशात त्रास होत असावा असं तिला वाटलं आणि ती घरीच उपचार करत राहिली.

    लंडन, 02 जून : आपल्याला कधी ना कधी तरी घशाची समस्या उद्भवतेच (Soreness in throat). घशात वेदना होतात, घशात खवखव जाणवते. पण या समस्येला बरेच लोक गांभीर्याने घेत नाहीत. काहीतरी थंड खाण्यापिण्याने किंवा तात्पुरती समस्या असावी असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं (Drinking hot water for throat relief). गरम पाणी पिणं, गरम पाण्याच्या गुळण्या करणं, गरम पाण्याची वाफ घेणं किंवा एखादं औषध घेणं असे घरीच काहीतरी उपचार करून आराम मिळवण्याचा प्रयत्न केला जातो (Causes of throat problem). असाच प्रयत्न यूकेतील एका तरुणीनेही केला पण जेव्हा त्रास अधिक वाढला आणि तिने काही मेडिकल टेस्ट केल्या. तेव्हा तो रिपोर्ट पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. 24 वर्षांची जॉर्जिना... बऱ्याच कालावाधीपासून तिच्या घशात दुखत होतं. जॉर्जिनाला टॉन्सिलची समस्याही होती. बऱ्याच वेळा तिच्या घशात इन्फेक्शनही झालं होतं. त्यामुळे आपल्या घशातील वेदनाही टॉन्सिलमुळेच असाव्या असं तिला वाटलं. टॉन्सिलची समस्या समजून ती अँटिबायोटिक्स घेत होती, गरम पाण्याने गुळण्या करत होती जेणेकरून घशाला आराम मिळेल. हे वाचा - आश्चर्य! महिनाभरातच दोनदा Pregnant झाली महिला; चमत्कारिक Pregnancy बाबत डॉक्टर म्हणाले... इतके उपचार करून जॉर्जिनाला बरं तर वाटलं नाहीच पण उलट तिची समस्या अधिकच वाढली. तिला तोंडही उघडता येईना. तेव्हा काहीतरी गंभीर आहे, याची जाणीव  तिला झाली. तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. तिथं डॉक्टरांनी मेडिकल टेस्ट केल्यानंतर जे सांगितलं ते ऐकून तिला धक्काच बसला. ईस्ट सुर्री हॉस्पिटलमध्ये तिच्या काही वैद्यकीय तपासण्यात करण्यात आला. टेस्टमध्ये तिला myeloid leukaemia (APML) असल्याचं निदान झालं. हा एक कॅन्सर आहे. जॉर्जिनाच्या वडिलांनाही हा कॅन्सर झाला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जॉर्जिनालाही इतक्या कमी वयात हा कॅन्सर झाला. आजाराचं निदान होताच जॉर्जिनाने तात्काळ उपचार सुरू केले. आतापर्यंत तिच्या आठ किमोथेरेपी झाल्या आहेत. तिची प्रकृती आता हळूहळू सुधारते आहे. हे वाचा - Singer kk life could be save by CPR : काय आहे हा CPR जो वाचवू शकला असता Singer KK चा जीव? वेळेत कॅन्सरचं निदान झाल्याने वेळेत उपचार करता आले. आता जॉर्जिना याबाबत लोकांना जागरूक करत आहे. शरीरातील कोणत्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला तिने लोकांना दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cancer, Health, Lifestyle

    पुढील बातम्या