Home /News /lifestyle /

कसं शक्य आहे? ना SEX, ना IVF तरी ती झाली प्रेग्नंट

कसं शक्य आहे? ना SEX, ना IVF तरी ती झाली प्रेग्नंट

सेक्सशिवाय प्रेग्नंट झालेल्या (pregnant without sex) या महिलेला पाहून डॉक्टरही हैराण झाले.

    ब्रिटन, 10 मार्च : मूल (baby) होण्यासाठी एकतर जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात किंवा IVF मार्फत प्रेग्नंट (pregnant) होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण एका महिलेच्या बाबतीत मात्र हे दोन्ही काहीही झालेलं नसतानाही ती प्रेग्नंट (pregnancy) राहिली. ब्रिटनमध्ये (Britain) घडलेलं हे विचित्र प्रकरण. महिलेला असं प्रेग्नंट झालेलं पाहून खरंतर डॉक्टरही हैराण झाले, ब्रिटनमध्ये राहणारी 28 वर्षांची निकोल मुरे  (Nicole Moore). विचित्र पद्धतीने गरोदर राहिली आहे. तिच्या प्रेग्न्सीच्या न्यूजनं सर्वांना धक्काच दिला आहे. निकोल व्हर्जिन होती. शारीरिक संबंध न ठेवताच ती प्रेग्नंट झाली. निकोलला अचानक तिला भीती वाटू लागली, चक्कर येऊ लागली, छातीत वेदनाही होऊ लागल्या, स्तनही सूजले.  ही सर्व प्रेग्नन्सीची लक्षणं होती. त्यामुळे तिच्या एका मित्राने तिला प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. पण आपण सेक्स केलंच नाही तर प्रेग्नंट कसं होणार, असं निकोल म्हणाली. तरी तिनं मित्राच्या सांगण्यावरून प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती चक्क पॉझिटिव्ह आली तेव्हा तिला धक्काच बसला. हे वाचा - अंतर्वस्त्रं खरेदी करताना स्त्रियांनी या गोष्टी तपासल्या नाही, तर आहे धोका रिपोर्टनुसार निकोलनं सांगितलं की  मी आणि माझ्या बॉयफ्रेंडनं शारीरिक संबंध ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला खूप वेदना व्हायच्या. मी साधं टॅम्पॉनसुद्धा वापरू शकत नव्हते. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आम्ही अनेक मार्ग निवडले, पण आम्हाला सेक्स करणं कधी शक्यच झालं नाही. निकोलनं असं सांगितल्यानंतर खरंतर डॉक्टरही हैराण झालं. पण  निकोलला लैंगिक संबंध ठेवणं का शक्य होत नव्हतं आणि ती तरीही प्रेग्नंट का राहिली याचं नेमकं कारण तिला प्रेग्नन्सी चेकअपदरम्यान समजलं. निकोलला वेजिनीस्मस (vaginismus) डिसीज होता. हा एका दुर्मिळ आजार आहे. हा आजार असलेल्या महिलांच्या व्हजायनाचे मसल्स खूप आकुंचित होतात ज्यामुळे त्यांना शारीरिक संबंध ठेवणं शक्य होत नाही.  पण अशा परिस्थितीत सेक्स नाही झालं आणि कोणत्याही पद्धतीनं जरी स्पर्म व्हजायनामध्ये गेले तरी प्रेग्नन्सीची शक्यता असते. हे फक्त वेजिनीस्मस या आजारात होऊ शकतं. हे वाचा - विमान उडताच महिलेने केले असे विचित्र चाळे की, अखेर सीटला ठेवलं बांधून! प्रेग्नंट राहिल्यानंतर निकोलनं आपल्या या आजारावर तज्ज्ञांच्या मदतीनं उपचार घेतले. तिला या आजारातून मुक्ती मिळाली आणि नंतर  डिलीव्हरीत काही समस्या आली. आज तिची ही मुलगी आठ वर्षांची झाली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Pregnancy, Pregnant, Sex, Woman

    पुढील बातम्या