Home /News /lifestyle /

Shocking! Beauty Treatment साठी गेलेल्या नववधूचा मृत्यू; पार्लरमध्येच सापडला मृतदेह

Shocking! Beauty Treatment साठी गेलेल्या नववधूचा मृत्यू; पार्लरमध्येच सापडला मृतदेह

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

पार्लरमध्ये गेल्यानंतर दोन तासांची नववधूच्या नवऱ्याला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली.

    लंडन, 03 जून : लग्न म्हटलं की महिलांच्या ब्युटी ट्रिटमेंट, मेकअप आलाच. नवरी लग्न आणि लग्नाच्या सर्व कार्यक्रमासाठी ब्लीच, फेशिअल, वॅक्सिंग अशा ब्युटी ट्रिटमेंट तर करून घेतेच. पण लग्नानंतरही आपल्या चेहऱ्यावरील नववधूचं तेज कायम राहावं यासाठी काही महिला या ट्रिटमेंट घेतात. अशीच एक नववधू ब्युटी ट्रिटमेंट घेण्यासाठी गेली. पण तिथंच तिचा मृत्यू झाला. पार्लरमध्येच तिचा मृतदेह सापडला आहे (Newly married bride died in salon during beauty treatment). मूळची न्यूझीलंडची असणारी 30 वर्षांची पियाता ताऊवाहर. 28 मे रोजी लंडनच्या वेल्समधील एका टॅनिंग सलूनमध्ये गेली. सामान्यपणे बरेच लोक गोरं होण्यासाठी ट्रिटमेंट घेतात. पण काही लोक असे असतात ज्यांना टॅनिंग आवडतं ते आर्टिफिशिअल टॅनिंग करून घेतात. यासाठी एका अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन मशीनचा वापर केला जातो. पियाताही अशीच ट्रिटमेंट घ्यायला गेली होती. तिने टॅनिंग सलूनमध्ये आपल्यासाठी 11 मिनिटांचं सेशन बुक केलं होतं. यादरम्यान तिचा नवरा इफान जोन्स तिला फोन करत होता. तब्बल दोन तास तो फोन करत राहिला पण तिने फोन उचलला नाही. त्यानंतर तिची सासू तिला शोधत सलूनमध्ये पोहोचली. हे वाचा - घर, हॉस्पिटलऐवजी महिलेने महासागराच्या कुशीत दिला बाळाला जन्म; हैराण करणारं कारण टॅनिंग सलूनमध्ये गेल्यानंतर दोन तासांची तिच्या मृत्यूची बातमी आली. पार्लरमध्ये तिचा मृतदेह सापडला. साऊथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 मे रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास त्यांना वेल्स अॅम्ब्युलन्स सर्व्हिसकडून फोन ला. Fforestfach मधील  Carmarthen Road  वरील व्यावसायिक परिसरात महिलेच मृतदेह मिळाल्याची माहिती आम्हाला मिळाली. तिला हृदयाची समस्या होती, असंही सांगितलं जात आहे. पोलिसांना या प्रकरणात काहीही संशय व्यक्त केला नाही आहे. पण तिच्या नवऱ्याने याबाबत टॅनिंग सलूनवर आरोप लावले आहेत. टॅनिंग सलूनच्या हलगर्जीपणामुळे आपल्या बायकोचा मृत्यू झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार nzherald.co.nz शी बोलताना त्याने सांगितलं, ज्या रूममध्ये ती सापडली ती बरोबर रिसेप्शन डेस्कसमोर होती.  त्यामुळे कुणी काही पाहिलं नाही,  असं कसं होऊ शकतंं. हे वाचा - शरीर संबंधानंतर केलं लग्न, संशय आल्यानंतर नवरी पोहोचली घरी...ते दृश्य पाहून हादरलीच! दरम्यान सलून स्टाफ एमा कोलर माइल्सने सांगितलं जोपर्यंत त्यांना माहिती मिळाली तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.  टॅनिंग सलूनने याप्रकरणाचा तपास करणार असल्याचं तसंच या प्रकरणात आवश्यक ती सर्व मदत करू असंही सांगितलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Death, Lifestyle, World news

    पुढील बातम्या