मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चिमुकल्याच्या तोंडात इतकं मोठं छिद्रं पाहून बसला धक्का; कारण वाचून तर तुम्ही पुरते हादराल

चिमुकल्याच्या तोंडात इतकं मोठं छिद्रं पाहून बसला धक्का; कारण वाचून तर तुम्ही पुरते हादराल

बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावरही व्हिटॅमिन बी 12च्या कमीचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावरही व्हिटॅमिन बी 12च्या कमीचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

बाळाच्या तोंडात छिद्र (hole in baby mouth) पाहून त्याचे आईबाबा घाबरले आणि त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

  • Published by:  Priya Lad

ब्रिटन, 13 मे : खरंतर हा फोटो पाहून तुम्हाला धक्काच बसला असला. या चिमुकल्याला नेमकं काय झालं आहे, त्याच्या तोंडात इतकं मोठं छिद्र कसं (Hole in baby mouth) काय पडलं? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. जितका धक्का तुम्हाला हा फोटो पाहून बसला असेल त्यापेक्षा किती तरी मोटा धक्का तुम्हाला यामागील कारण समजल्यावर बसेल.

इंग्लंडच्या एसेसेक्समधील हे बाळ. हार्वे असं त्याचं नाव आहे. तो अवघ्या 10 महिन्यांचा आहे. त्याची 24 वर्षांची आई बेकी स्टाइलेस त्याचं डायपर बदल होती. तेव्हा बाळाच्या तोंडाकडे तिचं लक्ष गेलं. बाळाच्या तोंडात वरच्या बाजून काहीतरी असल्याचं दिसलं तिनं जवळून पाहिल तर बाळाच्या तोंडाच्या वरच्या बाजूला छिद्र होतं. ती घाबरूनच गेली. लगेच आपल्या बाळाला घेऊन ती रुग्णालयाकडे धावली.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार बेकी म्हणाली, "मी त्याच्या तोंडात हात घालून काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला पण हार्वे रडत होता, किंचाळत होता. मी त्याच्या वडिलांना बोलावलं की ते त्याला पाहतील. मला तर घामच फुटला होता. हे कसं झालं ते समजतच नव्हतं. आम्ही त्याच्या तोंडात टॉर्च मारूनही पाहिला पण काही समजतच नव्हतं. काय करावं काहीच समजत नव्हतं. पण आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन आलो"

हे वाचा - अरे बापरे! टपटप... टपटप... पाणी नाही तर जमिनीवर चक्क कोसळला उंदरांचा पाऊस

रुग्णालयात गेल्यानंतर नर्सने आधी त्या बाळाला पाहिलं. अवघ्या काही सेकंदातच याचं कारण तिने सांगितलं. बाळाच्या तोंडात दिसणारं छिद्रं हे छिद्र नव्हतं तर तो एक स्टिकर होता.

हा स्टिकर त्या बाळाच्या तोंडाच्या वरच्या बाजूला चिकटला होता. जो चमकत होता. त्यामुळे सुरुवातीला पाहताच क्षणी तो एखादा होल असावा असाच दिसतो. अगदी या बाळाच्या आईवडिलांना सुरुवातीला तसंच वाटलं. बाळाचे पालकच काय तुम्हाला आम्हालाही हा फोटो पाहताच क्षणी ते छिद्रच वाटेल. तो स्टिकर असू शकतो, अशी पुसटशीही कल्पना आपण केली नसेल.

हे वाचा - कोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'

नर्सने बाळाच्या आईच्या लक्षात ही बाब आणून दिली आणि नंतर तिने बाळाच्या तोंडात आपलं बोट टाकून तो स्टिकर बाहेर काढला. तेव्हा कुठे बाळाच्या आईबाबांच्या जिवात जीव आला .

First published:

Tags: Parents and child, Small baby